
कोपरगाव प्रतिनिधी:-वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिश भाऊ कानडे व मा पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांचे वडील श्रीमद भगवत गीता मुखोद्गत असणारे गीताप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणुन प्रसिद्ध असणारे ह भ प वै सुखदेव कारभारी कानडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने झालेल्या किर्तन प्रसंगी बोलतांना प्रसिद्ध किर्तनकार तथा नारायनगिरी महाराज गुरुकुल संस्था नेवासा येथील प्रबोधनकार ह भ प महंत उध्दव महाराज मंडलिक म्हणाले की सध्याची पिढी भरकटत चालली असुन संस्कारक्षम सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे
ह भ प वै सुखदेव कानडे यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य जीवनभर चालु ठेवून शेवटपर्यंत भजन हरिपाठ काकडा तसेच गीता पारायनात सातत्य ठेवत अध्यत्मात कार्य केले त्यांनी केवळ कुटुंबांवर नाहींतर या परिसरातील अनेक परिवारांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी सतत प्रयत्न अर्थातच धर्माचे कार्य केले आहे त्यामुळे आपण पुढच्या पिढीला चांगले संस्कार देऊ शकलो तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल
महंत उध्दव महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून मंत्रमुग्ध होत हजारो भाविकांनी किर्तन श्रवनाचा लाभ घेतला त्यांना गायनाचार्य ह भ प चौधरी महाराज,ह भ प जनार्धन बर्गे,सोपान काका बाररहाते,भरत महाराज, मच्छिंद्र गायकवाड, सुनिल सुरभैया, घनश्याम वारकर,बाळासाहेब महाराज शेळके, मृदुंगाचार्य पुरुषोत्तम महाराज रवि चौधरी, अमोल सोळसे यांनी मोलाची साथ दिली
पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित किर्तनप्रसंगी वारी पंचक्रोशीतील भाविक आणि महिलांनी मोठया संख्येने किर्तन श्रवणाकरिता गर्दी केली होती


या कार्यक्रमासाठी गोदावरी दुध संघाचे सर्वेसर्वा जिल्हापरिषद सदस्य राजेश आबा परजणे पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेकेपाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब डमाळे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे ,नाशिक म न पा आयुक्त दत्तात्रय गोतिसे ,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विभागीय अध्यक्ष दिलिपराव कानडे,सरपंच बद्रीनाथ जाधव,माजी पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके नामदेवराव जाधव,ग्रा प सदस्य विशाल गोर्डे,अनिल गोरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य प्रकाशराव गोर्डे,संजिवनी कारखान्याचे वसंतराव थोरात,कैलास सातपुते,रावसाहेब टेके,उपसरपंच विजय गायकवाड, राहुल होन,गिरीधर पवार, नामदेव बढे,आसाराम डहारे गोरख टेके,सोसायटी चेअरमन नवनाथ अण्णा जाधव,राजेंद्र वाळुंज,डॉ दरंदले,डॉ हिमांशु त्रिवेदी गोदावरी बायोरिफायणारीजचे अधिकारी बी एम पालवे,संजय शिंदे, धनवटे एम डी कानडे, कामगार नेते सचिन टेके,शिवचरित्रकार सर्जेराव टेके पत्रकार रोहीत टेके,बापुराव घुमरे फकीर टेके आदींसह कानडे परिवाराचे नातेवाईक तसेच वारी पंचक्रोशी तील सर्व साईभक्त, तरुण मंडळे जय बाबाजी भक्त परिवार स्वामी समर्थ भक्त परिवार,जगदंबा आरती मंडळ,श्री रामेश्वर भगवान मंडळ ,स्वाध्याय परिवार अशा सर्व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि वारी,कान्हेगाव,शिंगवे,सडे धोत्रे,भोजडे,खोपडी येथील भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते
