के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कोपरगाव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
१२ वी विज्ञान शाखा – खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) नेरे तेजस विकास एकूण गुण – ५६० एकूण टक्के – ९३. ३३
२) नांदुरकर प्राजक्ता पंकज एकूण गुण – ५२८ एकूण टक्के – ८८. ००
३) दवंगे प्रणव रतन एकूण गुण – ५२२ एकूण टक्के – ८७. ००

१२ वी वाणिज्य शाखा – खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) देवकर अस्मिता रामराव एकूण गुण – ५६१ एकूण टक्के – ९३. ५०
२) शेटे अथर्व योगेश एकूण गुण – ५२४ एकूण टक्के – ८७. ३३
३) पवार ज्ञानेश्वरी शंकरराव एकूण गुण – ५१७ एकूण टक्के – ८६. १७

१२ वी कला शाखा - खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) मोहिते प्रियंका रघुनाथ एकूण गुण - ४८३ एकूण टक्के – ८०. ५०
२) गुंजाळ तनुष्का सनी एकूण गुण - ४७५ एकूण टक्के – ७९. १७
३) साळवे धनश्री महेंद्र एकूण गुण - ४४० एकूण टक्के – ७३. ३३
महाविद्यालयाचा एकूण कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेचा मिळून निकाल १०० %
तसेच संस्थेच्या के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके व चासनळी या दोन्ही महाविद्यालयाचा निकाल १०० % लागलेला आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त श्री. संदीप रोहमारे, सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी.आर. सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. ए. सी.नाईकवाडे यांनी अभिनंदन केले.
वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश प्रकिया सुरु झालेली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट करियर ओरिएंटेड अभ्यासक्रम बी.बी.ए.(सीए.), बी.सी.एस., बी.सी.ए. (सायन्स), बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) चे प्रवेश सुरु झाले आहेत. प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *