लोकमनाचा आधारवड पत्रकार महर्षी स्व.चंद्रकुमार भाऊलाल (सी.बी. ) गंगवाल‌ :- शब्दांकन नारायण अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
ध्येयवादी अभ्यासक, अविरत जनसेवी व्यक्तीमत्व , दांडगा जनसंपर्क, अहोरात्र जागरुकतेने बातमी मागील बातमी संशोधक, वंचितांच्या अन्यायाला वाचा फोडतांना अत्याचाऱ्यांना सळोकीपळो करणारा अवलिया स्व. चंद्रकुमार् भाऊलाल गंगवाल यांच्या अविस्मरणीय अनुभवी कर्तबारीचा प्रत्यय रात्रंदिवस येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्यावर त्यांच्या सहवासाने बालपणी लाभलेल्या बावनकशी परीस स्पर्शाने मी संस्कारीत झालो. या दैवी देणगीमुळे मी गंगवाल परिवारांचा कायम ऋणी आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अल्पवयात वृत्तपत्र वाचनाचा लळा लागला. वाचनात येणाऱ्या बातम्यांचे अवलोकन करता करता स्वतःला पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी जिज्ञासू वृत्तीने सायकल प्रवासातून आपला जनसंपर्क वाढविला. धार्मिक, सामाजिक , कॉंग्रेस सेवादल उपक्रमात भाग घेतला अल्पावधीत कोपरगाव तालुक्यात तसेच राज्यात जगात घडणाऱ्या, घडविणाऱ्या घटनांच्या मुळाशी जाऊन आपली जिज्ञासा पूर्ण करुन सुरवातीला आपल्या मित्रमंडळींना आपल्या संभाषण कौशल्यातून पटविण्यात ते कायम यशस्वी ठरले यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही . .
फक्त सायकल , तर वेळ प्रसंगी खाचखळगे, चिखल तुडवत थंडी, ऊन पाऊस भुक तहान यांची तमा बाळगता पूर्ण अर्धशतक वृत्तसेवा करुन जनतेची मने जिंकली याचमुळे त्यांचा वावर जनमानसात नसणं हे आज सर्वांना अडचणीचे ठरत आहे.
आपल्या अर्धशतकी पत्रकारितेचा शुभारंभ नासिकच्या दैनिक गांवकरी पासुन केला. यावेळी नगर, नाशिक व मनमाड अशी जीवघेणी जिद्दीने धावपळ करीत स्व. दादासाहेब पोतनीस यांची मने जिंकून सलग ४१वर्षे नगर व नाशिक जिल्ह्यातील जनतेची सेवा केली. एवढ्यावरच न थांबता मराठवाडा व लोकमत ( संभाजी नगर) ३१ वर्षे, मराठा ( आचार्य अत्रे) १२ वर्षे व नवाकाळ (मुंबई )३० वर्षे, विशाल सह्याद्री , तरुण भारत(२६वर्षे) ,सकाळ, केसरी ( पुणे ), समाचार (३९ वर्षे) व नवा मराठा सेवा (अहमदनगर), आणि यू एन आय व हिंदुस्थान समाचार या देशपातळीवरील वृत्तसेवा सह १८ लहान – मोठ्या वृत्तपत्रात काम केले.
या काळात स्व. दादासाहेब पोतनीस, आचार्य अत्रे, नानासाहेब परुळेकर, निळकंठ खाडिलकर, जयवंत टिळक, , अनंत पाटील ,चं.प. भिशीकर, राजेंद्र दर्डा, ह.म.कर्णिक, आचार्य चंदनमल गुंदेचा, जनुभाऊ काणे आदी संपादक महर्षींचे मार्गदर्शन लाभले.
या काळात समाजवादी नेते जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, बाबा आमटे, , योग महर्षी राम देव बाबा, चित्रपट अभिनेते राजकपूर, मनोज कुमार, सूनिलदत्त , पंतप्रधान लालबहादूर शास्त्री , पंतप्रधान इंदिरा गांधी, पंतप्रधान राजीव गांधी, पंतप्रधान चरणसिंग, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी , राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी, डॉ. शंकर दयाळ शर्मा, प्रतिभा पाटील, यशव़ंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, मुख्य मंत्री वसंतराव नाईक मुख्य मंत्री वस़ंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, मुख्यमंत्री शरद पवार आदी मान्यवर नेत्यांच्या वार्तालापात त्यांची कसोटी पणाला लागली. बातमीदारीच्या संदर्भासाठी त्यांनी कोपरगाव ते देशासह जागतिक पातळीवरील अविस्मरणीय घटना, व्यक्तीरेखांची लाखावरील कात्रणे, दहा हजार फोटो,पाच हजारांहून अधिक विविध वृत्तपत्रांतील कात्रणांचा, शेकडो पुस्तकांचा संग्रह संग्रहित केला. सी.बी म्हणजे एक पत्रकार क्षेत्रातील चालते बोलते विद्यापीठ होते याचमुळे सी . बी . गंगवाल यांना राज्यातील पत्रकार संघासह शंभरावर विविध संस्था, संघटनांनी गौरव पुरस्कारांनी गौरविले.
आपल्या अर्धशतकी वाटचालीत त्यांनी के.जे. सोमय्या महाविद्यालय, राहुरी कृषी विद्यापीठ पाठपुरावा कोपरगाव तालुक्यातील पाणी टंचाई, दुष्काळ, महापूर, विविध समस्या सोडविण्यात सिंहांचा वाटा त्यांनी शेवटपर्यंत उचलला.
या कर्तबगारी बळावर कोनपा स्विकृत सदस्य, विविध कमिटी सल्लागार, पत्रकार स़ंघाचे तालुका ते जिल्हा पदाधिकारी, पत्रकार भवन विश्वस्त, ,्कचनेर जैन समाज मंदिर १९ वेळा कार्यकारी मंडळ पदाधिकारी , उपाध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष म्हणून सेवेत, आदी विविध सामाजिक संस्था कार्यात आपला अमुल्य कार्याचा ठसा उमटवला .
सी.बी. गंगवाल यांच्या गौरवशाली वाटचालीत स्व.सौ. ज्योती भाभी ( बिजाबाई )चंद्रकुमार गंगवाल, श्रीमती छाया भाभी चंद्रकुमार गंगवाल, श्री. बाबुलाल पाटणी ( पत्रकार शिर्डी ) , कन्या सौ. सुवर्णा सुमेर कुमार काले, श्री. सुमेर काले, कमिशनर (जी. एस. टी. केंद्र शासन ) , सौ.सपना पहाडे ( अमळनेर ), सौ. नम्रता पाटोदी ( बडनेरा ) ,
पुत्र जितेंद्र व निलेश गंगवाल यांच्या सह सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब व त्यांचे कुटुंबीय, स्व.छोटुभाई जोगनपुत्रा, डॉ. डी. एस. मुळे, नारायण अग्रवाल, व योगेश जोगनपुत्रा आदींचा सिंहांचा वाटा आहे.
अशा महान आत्म्यांचे चरणी नतमस्तक होऊन परमेश्वराकडून त्यांच्या चिरंजीवी आत्म्यांस चिरशांती व सद्गती लाभो तसेच गंगवाल परिवाराकडून जास्तीतजास्त समाज सेवा घडविण्यासाठी सर्वं प्रकारचें बळ मिळो हीच सी. बी.च्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त देवो ईश्वरचरणी प्रार्थना!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *