एका धर्म योद्धयाला भावपूर्ण श्रद्धांजली:- नारायणशेठ अग्रवाल….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
एखादा वटवृक्ष कोसळावा आणि त्यामुळे धरणीकंप व्हावा अशी अशी दुर्दैवी घटना 27 मार्च रोजी कोपरगावात दुपारी अडीच वाजता घडली… प्रख्यात, प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते स्व. दिलीप सारंगधर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले.
स्व. दिलीपराव हे कोपरगाव शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात हिंदू रक्षणासाठी झटणारे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कोपरगाव क्षणभर सुन्न झाले…पूर्ण शहरात शोककळा पसरली… सनातन संस्थेचे मुखपत्र ‘सनातन प्रभात’ चा प्रचार व प्रसार करण्यात स्वतः स्व. दिलीपराव यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.
कोपरगाव शहरात हिंदू मोर्चा असो कि आंदोलने…तो स्व. दिलीपराव यांच्या शिवाय पूर्ण होणे नाही. ते अत्यंत प्रखरपणे आपली बाजू मांडण्यात प्रसिद्ध होते. मनमिळाऊ स्वभाव आणि सहकार्याची भावना यामुळे ते जनतेत लोकप्रिय होते. धार्मिक कार्यक्रम कोणताही असो पण त्यांच्या सनातन च्या स्टॉल शिवाय पूर्ण होत नव्हता हे एक सूत्रच बनले होते.
त्यांच्या या कार्यात त्यांचे संपूर्ण कुटुंब सहकार्य करीत असे. स्व. दिलीपरावच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच अशोक व राजेंद्र हे कर्तबगार भाऊ आणि त्यांचे पुतणे म्हणजे आमच्या इंदिरा शॉपिंग सेंटरचे युवा कार्यकर्ते तृप्ती भोजनालयाचे संचालक समीर हे आहेत.
शेवटी स्वर्गीय दिलीपराव यांच्या कार्यामुळे परमेश्वर नक्कीच त्यांना सद्गती देईल यात तीळमात्र शंका नाही.

भावपूर्ण श्रद्धांजली
-नारायण अग्रवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *