सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे मयत सभासदाचे वारसास दोन लाख रूपयांचा विमा धनादेश प्रदान…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उस उत्पादक सभासद शेतकरी व कर्मचारी यांच्यासाठी न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन जनता व्यक्तीगत अपघात विमा उतरविण्यांत आला असुन कारखान्याचे सभासद रामचंद्र एकनाथ कुलकर्णी (शहा सिन्नर) हे अपघातात मयत झाले त्यांचे वारस आनंदा रामचंद्र कुलकर्णी यांना विम्याचा दोन लाख रूपयांचा धनादेश अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यांत आला.
श्री. विवेक भैय्या कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, विमा ही काळाची गरज आहे., संकटसमयी ती कामाला येते. मनुष्यावर आपत्ती कधी ओढवेल हे सांगता येत नाही. सभासद कै. रामचंद्र कुलकर्णी यांचा रस्ते अपघात झाला होता त्याबाबत त्यांचे कुटूंबियांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून दिली त्यातुन त्यांचे वारस चिरंजीव आनंदा कुलकर्णी यांना दोन लाख रूपयांचा धनादेश नुकताच देण्यांत आला. याप्रसंगी संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदिप नवले, उपाध्यक्ष राजेंद्र परजणे, राजेंद्र बागुल, इतर सर्व संचालक, उस उत्पादक सभासद शेतकरी उपस्थित होते.

फोटोओळी-कोपरगांव-
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे सभासद रामचंद्र कुलकर्णी यांचे अपघाती निधन झाल्यांने त्यांचे वारस आनंदा रामचंद्र कुलकर्णी यांना कारखान्याने न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन घेतलेल्या जनता व्यक्तीगत अपघात विमा योजनेतुन दोन लाख रूपयांचा धनादेश अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यांत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *