
कोपरगाव प्रतिनिधी:-
१) प्रत्येकाचे किमान ३ महिन्यांचे विजेचे बिल माफ करा.
२) प्रत्येकाला किमान ३ महिने पुरेल इतके तांदूळ, डाळ, मीठ, मसाला, तेल हे घरोघरी पोहचते करा. (किमान खिचडी भात बनवून खाता येईल, पंचपक्वानांची अपेक्षाच नाही.)
३) किमान ३ महिने घरगुती गॅस मोफत द्या.
४)लोकांचे जे काही लोनचे हप्ते सुरू आहेत उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज, वयक्तिक कर्ज हे सर्व पुढचे किमान ३ महिने माफ करा आणि लोकांचे सिबील स्कोर खराब नाही होणार हेही जाहीर करा.
५) विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोजवारा उडवला आहातच मग शैक्षणिक फी माफ कराल हे देखील जाहीर करा.
आणि हे सगळं जमत नसेल तर आहे तसं आम्हाला आमच्या नशिबावर जगू द्या,उगाचच आमच्या अडचणी वाढवू नका.जबाबदारी घेता येत नसेल तर उपदेशाचे डोसही पाजू नका.
अंकुश वाघ
संस्थापक अध्यक्ष
कोपरगाव व्यापारी संघर्ष समिती…
