खेळातुन निरोगी शरीर, शुध्द मन व बुध्दीचा विकास:- डाॅ. दिपक माने…

कोपरगाव


संजीवनीमध्ये अंतर विद्यापीठ पश्चिम विभाग व्हाॅलीबाॅल स्पर्धा संपन्न..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-
मनुष्याला रोगांपासुन दूर राहण्यासाठी निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. एका निरोगी शरीरातुन निरोगी मन व बुध्दीचा विकास होतो. खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशिलता आणि माणवी गुणांचा विकास होतो. खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्वाची भुमिका बजावते. खेळ खेळल्याने तंदुरूस्ती सोबत मनोरंजनही होते. खेळाडूंनी जे खेळ खेळत नाही, त्यांना खेळाच्या प्रवाहात आणावे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेचे खेळ आणि शारीरिक शिक्षण मंडळाचे डायरेक्टर डाॅ. दिपक माने यांनी केले.
संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज आयोजीत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजीत पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ व्हाॅलीबाॅल (मुली) स्पर्धांच्या बक्षिस वितरण समारंभात डाॅ. माने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोेल्हे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेक्शन ऑफिसर प्रा. मनोहर कुंजिर, सचिव श्री ए. डी. अंत्रे, माजी राष्ट्रीय व्हाॅलीबाॅल खेळाडू श्री सुभाष पाटणकर, जिमखाना प्रमुख श्री डी. एन. सांगळे, टेक्निकल टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र , गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश व गोवा राज्यातील सुमारे ४५ विद्यापीठांच्या मुलींच्या व्हाॅलीबाॅल संघाने या सामन्यांसाठी हजेरी लावुन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
चार दिवस चाललेल्या अटितटीच्या सामन्यांमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठ, पुणे या संघाने प्रथम क्रमांक मिहविला. तर स्वर्निम गुजरात स्पोर्टस् युनिर्वसिटी, गांधीनगर,गुजरात संघाने दुसरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपुर संघाने तिसरा व लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फिजिकल एज्युकेशन युनिर्वसिटी , ग्वालियर, मध्यप्रदेश संघाने चौथा क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट खेळाडूंमध्ये बेस्ट लिबेरो वर्गवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भुमिका पोमण व बेस्ट अटॅकर वर्गवारीमध्ये श्रृती म्हशाळे, बेस्ट सेटर वर्गवारीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपुरच्या वैष्णवी ढोबळे आणि बेस्ट ऑलरावुंडर वर्गवारी मध्ये स्वर्निम गुजरात स्पोर्टस् युनिर्वसिटी, गांधीनगर, गुजरातच्या वालाकिंजल बेन यांनी बहुमान पटकाविला. वरील सर्व संघांना व उत्कृष्ट खेळाडूुंना मान्यवरांच्या हस्ते ट्राफी व प्रमाणपत्रांचे वितरण सन्माण पुर्वक करण्यात आले.
डाॅ. माने यांनी आपल्या भाषणात संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या नियोजनाचे कौतुक केले. तसेच काही टीम मॅनेजर व खेळाडूंनीही मनोगत व्यक्त करून उत्कृष्ट नियोजन आणि पंचांच्या पारदर्शक निर्णयांचे स्वागत केले. एकुण १६ पंचांनी काम पाहीले. याप्रसंगी श्री नितीनदादा कोल्हे व श्री ए. डी. अंत्रे यांनीही मनोगत व्यक्त करून चारही संघांना भुवनेश्वर येथे आखिल भारतीय पातळीवर होणाऱ्या सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासठी विशेष अधिकारी श्री प्रकाश जाधव, फिजिकल डायरेक्टर्स प्रा. गणेश नरोडे, प्रा. शिवराज पाळणे व प्रा. योगेश अव्हाड यांनी मोलाची भुमिका निभावली.
प्रा. साहेबराव दवंगे यांनी सुत्र संचालन केले तर श्री डी. एन. सांगळे यांनी आभार मानले.

फोटो ओळीः
संजीवनी अभियांत्रीकी महाविद्यालयामध्ये संपन्न झालेल्या अंतर विद्यापीठ मुलींच्या व्हाॅलीबाॅल सामन्यांमध्ये प्रथम क्रमांकाचे मान्यवरांच्या हस्ते बक्षिस स्विकारताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *