
कोपरगाव प्रतिनिधी:- कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार कोपरगाव पोलीस हे ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण हे झपाट्याने वाढत असून कोपरगाव शहारासह तालुक्यात देखील रुग्ण संख्या ही शतकापार वाढताना दिसत आहे.म्हणून प्रशासना कडून व जिल्हाधिकारी यांच्या कडून सूचना करण्यात आल्या नंतर निर्बंध लावण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व आस्थापने ही रात्री ८ वाजेनंतर व सकाळी ७ वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले.पाच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी करण्यात आली असून कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संपूर्ण आदेश हे तहसीलदार व नगरपालिका आणि पोलीस प्रशासनास देऊ केले आहे.
जे व्यावसाईक कोरोनाचे नियम पाळणार नाहीत व आपल्या दुकानातील व हॉटेल मधील गर्दीवर नियंत्रण ठेवणार नाहीत, अशा दुकानांवर व हॉटेल चालकांवर कारवाई करण्यात येणार असून, ती दुकाने सात दिवस पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा यापूर्वीच इशारा दिला असून रात्री आठ वाजेनंतर दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.असे असून देखील मात्र त्याकडे हॉटेल व्यावसायिकांनी दुर्लक्ष करत हे नियम पायदळी तुडवल्याने कोपरगाव शहरातील २ हॉटेल बियर बार दुकाने प्रशासनाने रात्री सील केली आहेत.अशी कारवाई निरंतर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही हॉटेल मध्ये कोरोना नियमाचे कुठलेही पालन केले गेले नसल्याने सदची हॉटेल पुढील सात दिवसा करीता प्रशासना मार्फत सील करण्यात आली आहे.सदरची कारवाही पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व योगेश चंद्रे तहसीलदार आणि नगरपालिका कर्मचारी यांनी केली आहे.
