
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथे डॉ. गणेश गायकवाड यांच्या नविन जागेत स्थलांतरित झालेल्या अद्ययावत कॉस्मेटिक व डेंटल मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे उदघाटन आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने, शहराध्यक्ष सुनील गंगूले, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. महेंद्र गोंधळी, बानेश गायकवाड, श्री. विभूते, डॉ. किशोर नागरे, डॉ. आतिष काळे, सचिन भडकवाडे, किशोर नागरे, बंडू शिंदे, सतीश लोढा, गायकवाड कुटुंबीय आदी उपस्थित होते.
