अनाथ भगिनींनी जपला १५ वर्षांपुर्वीचा स्नेहालयाचा रुणानुबंधन…!

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
स्नेहालय मध्ये 15 वर्षांपूर्वी कोपरगाव येथील साईनाथ नाका परिसरातून 2 अनाथ बहिणी सामाजिक कार्यकर्ते विजयराव वहाडणे घेऊन आले होते. काल दि . २६/०३/२०२१ रोजी त्यातील एक माजी विद्यार्थिनी कु.निशा भामा खैरनार ही स्नेहालय भेटीसाठी आली होती. निशा सध्या पुणे येथील एका नामांकित कंपनीमध्ये मार्केटिंग ऍण्ड पी.आर.ओ डिपार्टमेंट मध्ये मुख्य व्यवस्थापक ,या पदावर कार्यरत आहे. 5 आकडी पगार आहे.इंग्रजी सफाईदार बोलते. स्नेहालय संकुलास भेट दिल्यावर सर्व मुलींसोबत तिने आज संवाद साधला. या प्रसंगी तिने तिचा कोपरगाव ते स्नेहालय,येथून पुणे आणि जर्नलिझम (मास् कम्युनिकेशन) हा प्रवास सांगितला.मुलींना देखील प्रेरणा मिळाली. तिने स्नेहालयातील मुलांसाठी एक वेळचे गोड जेवण भेट म्हणुन दिले. यापुढे तिच्या प्रत्येक वाढदिवशी ती संस्थेला अशीच देणगी देणार आहे, असेही तिने सांगितले. प्रियंका शेंडगे ही नेत्रतज्ज्ञ झाली. तिनेही देखील निशा सोबतचा प्रवास सांगितला . या प्रसंगी अनिल गावडे सर , स्नेहालय पुनर्वसन संकुलाचे अधिक्षक समाधान धालगुडे , यांनी देखील निशाबाबत चे अनुभव सांगितले. तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *