तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूलची राजेश्वरी होने प्रथम….

Uncategorized

तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूलची राजेश्वरी होने प्रथम…
कोपरगाव प्रतिनिधी:- पंचायत समिती कोपरगाव आणि विज्ञान – गणित अध्यापक संघ द्वारा तालुकास्तरीय विज्ञान , गणित व पर्यावरण प्रदर्शन २०२३-२४ प्रदर्शनाचे आयोजन राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर कोळपेवाडी येथे ३ व ४ जानेवारी २०२४ या दरम्यान दोन दिवसांच्या कालावधीत हे प्रदर्शन पार पडले .
या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते पाचवी विज्ञान गटात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूल ची राजेश्वरी होने हिने प्रथम क्रमांक पटकावला. याप्रसंगी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. तिने फोटो वोल्टाइस या उपकरणाच्या मदतीने सौर ऊर्जेद्वारे ठिबक सिंचन व्यवस्थापन करून शेतीला पाणीपुरवठा करू शकतो. तसेच शेतकरी फक्त शेतीला रात्रीच पाणीपुरवठा न करता दिवसा देखील करू शकतात. तसेच एकदा सुरुवातीलाच गुंतवणूक केल्यानंतर पुन्हा खर्च करण्याची गरज देखील नाही हे अतिशय सोप्या भाषेत परीक्षकांना समजावून सांगितले. यात तिला विज्ञान शिक्षिका चैताली पुंडे यांनी मार्गदर्शन केले व गणित विषयासाठी प्रियंका निकम यांनी मार्गदर्शन केले.संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र झावरे, उपाध्यक्ष किरण भोईर,कार्यकारी संचालक विशाल झावरे , शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी तिचे कौतुक करत अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शाळेकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने व तसेच राजेश्वरी व इतर विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सर्व पालकांनी शाळेचे कौतुक करत आभार मानले.
तसेच सहावी ते आठवीच्या गणित गटात कृष्णांगी गायकवाड व विज्ञान गटात यश हाडा,नववी ते बारावीच्या विज्ञान गटात ओम शिंदे, दीपक कोळपे व गणित गटात रुद्र खैरे यांनी शाळेच्या वतिने प्रदर्शनात सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *