श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे अलौकिक कार्य:- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रेष्ठ संत श्री संताजी जगनाडे महाराज यांनी समाज व्यवस्थेला प्रबोधनाचा खजिना दिला आहे.संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथेचे संतअमृत आपल्या पर्यंत येण्यात जगनाडे महाराज यांचे महत्वाचे स्थान आहे अशी प्रतिक्रिया सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी जगनाडे महाराज यांच्या जयंतनिमित्त कोपरगाव शहरात आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी दिली.
समाजाला एकविसाव्या शतकात डिजिटल क्रांती घडविताना अध्यात्मिक ठेवा देखील मोलाचा आहे.मानसिक आणि वैचारिक स्थिरता ही अध्यात्म देते.संत महंत हे समाजाला उध्दार करण्यासाठी आयुष्य खर्ची घालतात त्यामुळे युवा पिढीला त्यांचे योगदान स्मरणात राहण्यासाठी जयंती पुण्यतिथी सोहळे महत्वाचे ठरतात.जगनाडे महाराज यांचा समाज सुधारणेचा मूलमंत्र आणि तुकाराम गाथा या पवित्र अभंग गाथेचा विचार आपल्यात रुजविण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हणून निसर्ग शेती पाणी आणि पशू यांचे महत्व आपल्याला तुकाराम महाराजांच्या अभगांना मुखोद्गत करून जगनाडे महाराज यांनी इंद्रायणीत अभंग तरंग उमटविले.जाती पाती मोडून काढा या जगात केवळ स्री आणि पुरुष हे दोन फरक देवाने केले आहेत बाकी इतर जाती धर्म यात अडकून माणुसकी हरवू नका असा संदेश जगनाडे महाराज यांनी दिला आहे.
याप्रसंगी राजेंद्र वालझाडे, राजेंद्रजी राऊत, राजेंद्र सोनवणे, संतोष सोनवणे, प्रमोद कवाडे, गोरख देवडे, शगणेश सोनवणे,चंद्रकांत मोरे,संकेत सोनवणे,रामदास गायकवाड,चेतन महापुरे,शुभम व्यवहारे,गौरव वालझाडे, सुरज सोनवणे,चेतन सोमवंशी,जय राऊत,सुरेश सोनवणे,युवराज सोनवणे व संत जगनाडे महाराज सेवाभावी ट्रस्ट सर्व सदस्य,भाविक भक्त उपस्थित होते

चौकट – यावेळी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्सव सोहळा निमित्त संत जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन येथे सारेगमप लिटील चॅम्प्स महाविजेती कु.गौरी पगारे व दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया निवड झाल्याबद्दल कु.अक्षय सुनिल रत्नपारखी तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सबाजीराव बनसोडे,गणेश बबनराव वालझाडे, प्रमोद भागवत बनसोडे, सोनाली गणेश महापुरे या सदस्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *