
S.G न्युजने घेतली सभाव्य उमेदवारांची मुलाखत ..
कोपरगाव प्रतिनिधी:-
शिर्डी लोकसभेमध्ये अनेक समस्या सोडवण्यासाठी तसेच शिर्डी लोकसभेचा विकास हेच माझे ध्येय असून यासाठी मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे इंजिनियर किरण सुधाकर जाधव यांनी सुतावाच केले आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांनी पाहिजे तसे काम केले नाही त्यामुळे शिर्डी लोकसभेचा विकास झाला नाही शिर्डी लोकसभेमध्ये तरुणांच्या प्रश्न सोडविण्यासाठी तसेच शिर्डी लोकसभेमध्ये असलेले विविध तालुक्यांचे समस्या सोडविण्यासाठी मी पुढाकार घेणार असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गोर गरीब शोषित वंचित अशा नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री नितीनजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे इंजिनियर किरण जाधव यांनी म्हटले आहे शिर्डी लोकसभा मतदार संघातील स्थानिक तरुण हा आपला शेती व्यवसाय संभाळून देखील उच्च शिक्षण घेत आहे. उच्च शिक्षणाचे माहेरघर हा आपला नगर जिल्हा असुन येथे अभियांत्रिकी ते वैद्यकीय असे अनेक विविध उच्च शिक्षणाचे कॉलेज, महाविद्यालय आहेत. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून गुणवंत विद्यार्थी येथे येऊन शिक्षण घेतात. परंतु दर्जेदार शिक्षण प्राप्त करुन पुढील रोजगारासाठी इतर जिल्ह्यात ,राज्यात येथील विद्यार्थी जातो आहे. स्थानिक युवकांना रोजगार अभावी इतर आसपासच्या शहरात संधी शोधावी लागते व या संघर्षात स्थानिक युवकांचे मनोबल खच्चीकरण होते आहे. शेती व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आपली क्षमता दाखवून जगाला गवसणी घालण्याची नगर जिल्ह्यातील युवकांची क्षमता आहे. स्थानिक युवक हा आज पण बेरोजगार आणि निराश आहे. शिर्डीची उत्तम कनेक्टिव्हीटी असुन देखील येथे मोठ्या उद्योगांना चालना आज पर्यंत मिळाली नाही. उत्तर नगर मध्ये जर दर्जेदार शिक्षण संस्था आहेत तर आज पर्यंत मोठे उद्योग का आले नाही ?शिर्डी लोकसभेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे अनेक गावात विविध समस्या आहेत या समस्या विद्यमान खासदारांनी सोडविल्या नाहीत त्यामुळे जनता सुद्धा त्रस्त झाली आहेत शिर्डी लोकसभेसाठी मी अनेक समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे गेल्या पंधरा वर्षात शिर्डी लोकसभा राखीव मतदार संघ असून या राखीव मतदार संघामध्ये विद्यमान खासदारांनी कामकाज केले नाही त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे काँग्रेस पक्षाकडून शिर्डी लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस पक्षाकडून देखील मागणी वाढत आहे या मागणीला देखील काँग्रेस पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळत आहे गेल्या पंधरा वर्षाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिर्डी लोकसभेसाठी नवीन चेहरा मतदार शोधत आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी चांगला उमेदवार मतदार शोधत आहे या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी मी उमेदवारी लढविणार आहे असे इंजिनियर किरण जाधव यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे
