कोपरगाव पिपल्स बँकेच्या चेअरमन पदी श्री.राजेंद्र शिंगी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन:- नारायणशेठ अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नुकतीच कोपरगाव पिपल्स बँकेच्या चेअरमन पदी प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक क्षेत्रात योगदान असणारे श्री.राजेंद्र मोतीलालजी शिंगी यांची बिनविरोध निवड झाली.
स्व.माणिकभाऊ शिंगी हे श्री.राजेंद्र शिंगी यांचे चुलते व पिपल्स बँकेचे संस्थापक,शिंगी कुटुंबाचे पिपल्स बँकेशी जिव्हाळ्याचे संबंध होते व श्री.शांतीलालजी शिंगी हे बरेच वर्ष पीपल्स बँकेचे संचालक व चेअरमन होते.
श्री.राजाभाऊ शिंगी यांची चेअरमन पदी निवड ही लहान मोठ्या व्यापाऱ्यांना अभिमानाची गोष्ट आहे.
राजाभाऊ शिंगी हे शांत,संयमी,अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांच्या नेतृत्वाखाली “मुंबादेवी पतसंस्थेने” बाजारपेठेत मोठे नाव कमावले आहे.
राजाभाऊ शिंगी गेली 14 वर्ष पीपल्स बँकेचे संचालक आहे. त्यांचा मोठा अनुभव व मार्गदर्शन पीपल्स बँकेला लाभेल व बँकेची उत्तरो उत्तर प्रगती होईल यात शंका नाही.
राजाभाऊ शिंगी यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मोठा मित्र परिवार लाभला आहे.
अत्यंत दानशूर व समाजसेवा करण्यात सतत पुढे असणारे राजाभाऊ कोपरगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.राजाभाऊ शिंगी यांच्या कडे कधी कोणत्याही काम घेऊन गेल्यावर नाराज झाला अस होत नाही. लहान मोठ्या व्यापाऱ्यांशी त्यांचा नेहमीच संबंध असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यथा व मागण्या माहीत आहे.त्यांच्या कारकिर्दीत कोपरगाव बाजारपेठेला फायदा व मार्गदर्शन होईल यात शंका नाही. पुनश्च एकदा लहान मोठ्या व्यापारी वर्गाकडून हार्दिक व जाहीर अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा..!-नारायणशेठ अग्रवाल कोपरगाव.मो.9822630330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *