

कोपरगाव प्रतिनिधी:-
मा.पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील साहेब,अपर पोलीस अधिक्षक डॉ.दिपाली काळे मॅडम,मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.संजय सातव साहेब यांचे मागदर्शन व सुचने प्रमाणे आज ता.26/3/2021 रोजी कोपरगांव शहर पो.स्टे. येथे 11.00 ते 13.30 वा.दरम्यान टु प्लस( दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले) यादीतील 23 आरोपी,दुय्यम पोलीस अधिकारी,पोलीस पाटील,बिट अंमलदार यांचा मेळावा घेण्यात आला मेळाव्या दरम्यान टु प्लस यादीतील गुन्हेगारांचे सर्व ऍ़गलने फोटो घेण्यात आले आहेत तसेच सदर गुन्हेगारांना त्यांचेवर दाखल असणारे गुन्हयाची त्यांना जाणीव करुन दिली असुन सदर गुन्हयामुळे त्यांना समाजात जिवन जगताना अपमानीत झाल्यासारखे वाटत असेल पुन्हा चांगले जिवन जगण्यासाठी गुन्हयाची पार्श्वभुमीतुन बाजुला कसे निघता येईल त्या बाबत काय करायला पाहिजे याची माहीती देवुन गुन्हेगारांना सुधारण्यासाठी योग्य ते समुपदेशन केले असुन चांगल्या कामासाठी पोलीस नेहमीच तुमच्या मदतीसाठी तयार राहतील याची त्यांना जाणीव करुन दिली व गुन्हेगारांचे वर्तनात सुधारणा होणे करीता तसेच भविष्यात त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळु नये या करीता त्यांचे मनपरिवर्तन होणे करीता त्यांना योग्य ते समुपदेशन पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यानी केले.

सोबतच कायदयाचया चाकोरीत राहूनच जिवन जगणयाचा सलला हजर आरोपिताना दिला.
(वासुदेव रा.देसले)
पोलीस निरीक्षक,कोपरगांव शहर पो.स्टे.
