जिल्हा बँक निवडणूकीसाठी रामभाऊ काळे यांचा अर्ज दाखल…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
राहुरी – दि. २५ जानेवारी
राज्य निधी फेडरेशन चे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ काळे यांचा अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणूक साठी बिगरशेती संस्था मतदारसंघातुन अर्ज दाखल.
अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणूक २०२०-२१ ते २०२५-२६ साठी आज दि. २५ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती.
राहुरी फॅक्टरी ता. राहुरी जि. अहमदनगर येथील रहिवासी असलेले रामचंद्र उर्फ रामभाऊ विठ्ठल काळे हे राहुरी अर्बन निधी संस्थेचे संस्थापक चेअरमन असून, आदर्श नागरि सह पतसंस्था मध्ये सलग २३ वर्ष संचालक आहेत, त्याच प्रमाणे साई आदर्श मल्टिस्टेट को ऑप सोसायटी चे ते संस्थापक संचालक असून सध्या राज्य निधी फेडरेशन चे ते अहमदनगर जिल्हा अध्यक्ष असल्याने रामभाऊ काळे यांनी बिगरशेती संस्था मतदारसंघातुन जिल्हा बँक निवडणूक मध्ये दुपारी ०२.३० वाजता अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघात चुरस वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *