ब्राम्हणगांवच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे ज्ञानदेव जगधने विनविरोध…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील ब्राम्हणगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाचे ज्ञानदेव किसन जगधने यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी काम पाहिले.
उपसरपंच निवडीत श्री संजय लहानु पवार यांनी ज्ञानदेव जगधने यांच्या नावाची सुचना केली याप्रसंगी सरपंच अनुराग प्रभाकर येवले, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री. संजय अशोक वाबळे, कुसुमबाई कारभारी बनकर, अनिता नानासाहेब जाधव, वनिता बाळासाहेत्र बनकर, यमुनाबाई हरिभाउ आसने, रंजना शांताराम बनकर, सुनिता मोतिराम शिंगाडे, लहानुबाई बाळू माळी, रेणुका विठठल दोडके, रावसाहेब भिमा शिंगाडे, देविदास चांगदेव आसने यांनी सहभाग नोंदविला. नवनिर्वाचित सरपंच अनुराग येवले व उपसरपंच ज्ञानदेव जगधने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवृत्ती बनकर याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह मंत्रालय स्तरावरील विविध विकास कामांचा पाठपुरावा करून मोठया प्रमाणात निधी मिळविला. स्थानिक स्वराज्य संस्था हया ग्रामविकासाचा पाया आहेत, त्यातून सर्व सदस्यांनी विकास योजना राबवाव्या. सत्कारास उत्तर देतांना सरपंच अनुराग येवले म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ग्राम विकासाच्या सर्व योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करून ब्राम्हणगांव विकासात योगदान देवु.
याप्रसंगी सर्वश्री सुकदेव त्रंबक सोनवणे, पोपटराव रावजी आसने, चांगदेव कारभारी आहेर, कचरू जाधव, साहेबराव येवले, केशवराव येवले, बाळासाहेब बनकर, दिलीपराव बनकर, प्रकाश जाधव, सोनवणे सर, अरूण महाजन, विठठल बनकर, लहानु आसने, भागवत वाकचौरे, शिवाजी सोनवणे, बाबुराव वाकचौरे, आण्णा जगधने, दादाभाउ देवकर, दत्तात्रय माळवदे, शांताराम जगधने, रामदास पवार, किशोर तनपुरे, बाळासाहेब गंगावणे, त्रंबक साळवे, विठठल दोडके, भाउराव दोडके, संजय शिंगाडे, जगन आहेर यांच्यासह ब्राम्हणगांव पंचक्रोशीतील विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी ग्रामसेवक श्री. पाटील यांनी आभार मानले.

फोटोओळी-कोपरगांव-
ब्राम्हणगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाचे ज्ञानदेव किसन जगधने यांची बिनविरोध निवड झाल्याबददल सरपंच अनुराग येवले व उपसरपंच ज्ञानदेव अगधने यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *