देवळाली प्रवरा साठी एसटी बस स्थानकास मंजूरी देवून शटल बस सेवा सुरू करणेची मागणी :- आप्पासाहेब ढुस…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी ( राहुरी):-
देवळाली प्रवरा शहरासाठी अद्ययावत एसटी बस स्थानकास मंजूरी देवून जवळपास च्या श्रीरामपूर, राहुरी आणि ३२ गावांना शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टीने जोड़नेसाठी शटल बस सेवा सुरू करावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे यांचेकडे ईमेलद्वारे केली आहे.
आप्पासाहेब ढुस यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यात देवळाली प्रवरा हे जवळपास ३५ हजार लोकवस्ती असलेले क वर्ग नगरपालिका असलेले व जवळपासच्या ३२ गावांना जोडलेले महसूल मंडळाचे मोठे शहर आहे.
तसेच देवळाली प्रवरा शहर हद्दीत विविध शाळा, कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज, अध्यापक महाविद्यालय सारख्या विविध शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणेसाठी हजारो विध्यार्थी बाहेर गावाहून दररोज देवळाली प्रवरा येथे येतात.
तथापि देवळाली प्रवरा येथून सायंकाळी जवळच्या श्रीरामपूर राहुरी या तालुक्याच्या ठिकाणी जानेसाठी व तेथून येनेसाठी एसटी बस सेवा उपलब्ध नाही. तसेच देवळाली प्रवरा महसूल मंडळाच्या हद्दीतील ३२ गावांना सुद्धा एसटी च्या शटल बस सेवेद्वारे जोडले नसलेणे या हजारो विद्यार्थ्यांना प्रवासाची गैरसोय सहन करावी लागत आहे.
तसेच देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी या ठिकाणी अद्ययावत असे एसटी बस स्थानक व्हावे म्हणून कित्येक वर्षांची मागणी आहे, बसस्थानक नसलेणे ऊन वारा आणि पावसात येथील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि लहान व्यवसायिक यांना खूप त्रास सहन करावा लागतो.
तसेच जर देवळाली प्रवरा येथे शटल बस सेवा सुरू केली तर येथील लहान उद्योगांना व्यावसायिकांना चालना मिळेल, उद्योग वाढतील व एसटी महामंडळालाही त्याचा फायदा होईल.
सबब आपणास विनंती की, देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी साठी अद्ययावत एसटी बस स्थानकास मंजुरी देऊन देवळाली प्रवरा येथून जवळच्या श्रीरामपूर, राहुरी सह ३२ गावांना शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टीने जोड़नेसाठी शटल बस सेवा सुरू करावी असे निवेदनात शेवटी ढुस यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *