
कोपरगाव प्रतिनिधी:- दि.19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत आहे.
दि 28 रोजी गणेश विसर्जन होणार आहे आणि कोपरगाव शहरातील विसर्जन मिरवणुका या मोठया प्रमाणात व नाविन्यपूर्ण असतात.,त्यामुळे या मिरवणुका बघण्यासाठी मोठया प्रमाणात नागरिक-महिला -मुली बाहेर पडत असतात.
परंतु मिरवणुकीतील मंडळाची संख्या बघता मिरवणूक मार्ग हा अतिशय छोटा आहे.त्यामुळे एकाच वेळी अनेक मंडळे हे आपापली कला सादर करीत असतात.
सदरील मिरवणूक मार्ग हा गुरुद्वारा रोड येथील खर्डे कॉम्प्लेक्स ते सावरकर चौक इतकाच आहे. परंतु तरी देखील सदरील मार्गावर गेली काही वर्षे सोडली तर मोठ्या प्रमाणात अंधार या मार्गावर असतो त्यामुळे अनेक मंडळांना आपली कला सादर करताना अडचणी निर्माण होतात व प्रेक्षकांना देखील अंधारामुळे अडचण होते.
तरी सदरील मार्गवरील अंधार दूर करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने उपाय योजना करावी अशी मागणी भाजपा-वसंत स्मृती ने लेखी स्वरूपात केलेली आहे.
शिवाय सदरील निवेदनात हॅलोजन कुठे कुठे लावावेत त्या जागा देखील सुचविण्यात आलेल्या आहेत.
निवेदनावर सर्वस्वी विजराव वाहडणे,विनायक गायकवाड, चेतन खुबाणी, योगेश वाणी, विनीत वाडेकर, संजय कांबळे,वसंत जाधव,नंदकुमार जोशी,किरण थोरात,मनोहर कृष्णानी,प्रमोद पाटील,,रविंद बागरेचा, प्रभाकरजी वाणी आदीनच्या सह्या आहेत.
द्वारा-चेतन खुबाणी
