रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेसाठी ३५.९८ कोटीची तांत्रिक मान्यता रांजणगाव देशमुख सह सहा गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी:- ना.आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील रांजणगाव देशमुखसह वेस, सोयेगाव, धोंडेवाडी, बहादरपुर, अंजनापुर, मनेगाव या सात गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेसाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत ३५.९८ कोटी निधीस तांत्रिक मान्यता मिळाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनुत्तरीत होता ना.आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून मतदारसंघातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न मार्गी लावून या गावातील नागरिकांची तहान भागविली आहे. उर्वरित गावांचा देखील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यापैकी रांजणगाव देशमुखसह वेस, सोयेगाव, धोंडेवाडी, बहादरपुर, अंजनापुर, मनेगाव या सात गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजना देखील होती. हि योजना परवडणारी नाही असा या योजनेवर शिक्कामोर्तब करून या योजनेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र ज्यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीची सत्ता आल्यापासून ना. आशुतोष काळे यांनी या योजनेला पुनर्जीवित करून हि योजना मागील पाच वर्षापासून पुन्हा सुरु करून या सात गावांचा पाणी पुरवठा काही प्रमाणात सुरळीत केला होता. मात्र कित्येक वर्ष योजनेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हि योजना पूर्ण क्षमतेने सुरु होत नव्हती व काही कामे देखील अपूर्ण अवस्थेत होते. त्यासाठी मोठ्या निधीची गरज होती.
त्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून वारंवार बैठका घेतल्या. हि योजना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी या योजनेला निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्यातून या रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेसाठी ३५.९८ कोटीच्या निधीस तांत्रिक मंजुरी मिळविण्यात ना. आशुतोष काळे यशस्वी झाले आहे. सात गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरण्यासाठी पाणीपुरवठा योजनांक्या ३५.९८ कोटीच्या निधीस तांत्रिक मंजुरी मिळविली आहे. पुढील प्रशासकीय मंजूरी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरूच असून लवकरात लवकर प्रशासकीय मंजुरी देखील मिळवणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेसाठी ३५.९८ कोटी निधीस तांत्रिक मंजुरी मिळविल्याबद्दल रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, धोंडेवाडी, बहादरपुर, अंजनापुर, मनेगाव या सात गावातील नागरिकांनी ना.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेला ३५.९८ कोटीची तांत्रिक मंजुरी दिल्याबद्दल ना.आशुतोष काळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *