
कोपरगाव प्रतिनिधी:- येथील श्री. सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स, अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज मधील बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बी.बी.ए.) विभागाच्या वतीने ५ ऑगस्ट २०२३ रोजी ‘करिअर कौन्सिलिंग’ कार्यक्रम संपन्न झाला. पदवीधर मुलांना शैक्षणिक वाटचाल करताना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, संसदेच्या कायद्यानुसार वैधानिक असणारी संस्था ‘द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया’ नाशिक चाप्टर यांच्यामार्फत मार्गदर्शनपर व्याख्यानांचा लाभ विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ .रमेश सानप हे होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी ‘द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया’ संस्थेचे चेअरमन श्री अरिफ खान मसूरी तसेच त्यांचे सहकारी श्री. योगेश कातकडे (समन्वयक), श्री. नितीन डोंगरे(चार्टर्ड अकाउंट),श्री. किरण देशमुख(C.M.A.),श्रीमती मोनिका भंडारी(Faculty member),यांनी तज्ज्ञ व्याख्याते म्हणून व्याख्याने दिली. यातून विद्यार्थ्यांना बी.बी.ए. पदवीच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन प्राप्त झाले. तसेच ‘कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटं’ या कोर्स बद्दलही माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांसोबतच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात श्री. आरिफ खान मन्सुरी आणि श्रीमती मोनिका भंडारी यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीबद्दल असलेल्या प्रश्नांचे निरसन केले; त्याचबरोबर सी. एम. ए. कोर्स केल्यानंतर मिळणाऱ्या भविष्यकालीन संधींची ओळख करून दिली. श्री. आरिफ खान मन्सुरी यांनी सी.एम.ए. कोर्स, अभ्यासक्रम, मूल्यमापन, विद्यार्थ्यांची जबाबदारी, आव्हाने आणि संधी अशा विविध बाबींची मार्मिक व्हिडिओच्या आधारे सविस्तर माहिती करून दिली. त्यामुळे श्री. मंसुरींचे विवेचन सर्वांनाच प्रभावित करणारे ठरले. याबरोबरच कोपरगाव शहरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट श्री. नितीन डोंगरे यांनी आपल्या खास दिलखुलास शैलीतून विद्यार्थ्यांना भविष्याचे नियोजन कसे करावे, याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. रमेश सानप यांनी आपल्या अनुभवातील उदाहरणे देऊन,पदव्युत्तर शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी ध्येय कसे निश्चित करावे, त्यासाठी कोणत्या व कशा योजना आखाव्या याविषयी विद्यार्थ्यांना संबोधित केले. तर वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत यांनीही आपल्या अनुभवातून, ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन बी.बी.ए. विभागाचे विभागप्रमुख नितीन साळवे व त्यांचे सहकारी प्रा.श्री.गवारे एम.बी., श्रीमती गांधी सी.एम. व जाधव एस. एस. यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. संस्कृती गायकवाड हिने केले; तर सूत्रसंचालन कुमारी अणुका जोशी व कुमारी ऋतुजा मोहिते यांनी केले. सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार कु. सानिका पांगारकर हिने व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी बी.बी.ए. व एम. कॉम. विभागातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने व बहुसंख्येने सहभागी झाले होते.
