
कोपरगाव प्रतिनीधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व वाणिज्य मंडळच्या वतीने कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्राचे उद्घाटन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट ऑफ इंडिया (आय. सी. एम. ए. आय.) नाशिक चाप्टर चे प्रमुख सीएमए आरिफ खान मंसूरी, समन्वयक योगेश कातकडे, सीएमए मोनिका भंडारी, कोपरगाव येथील कर सल्लागार नितीन डोंगरे, सीएमए अमोल देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयातील नोकरीच्या विविध संधी तसेच सीएमए कोर्स करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम व महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. सीएमए आरिफ खान मंसूरी यांनी आपल्या मनोगतात वाणिज्य शाखेतील विविध संधी नमूद करतांनाच विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, ध्येय, चिकाटी व परिश्रम याचा अवलंब करून यश संपादन करावे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. सीएमए मोनिका भंडारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आयसीएमएआय या कोर्स संदर्भात विस्तृत माहिती दिली. कोपरगाव येथील कर सल्लागार मा. नितीन डोंगरे यांनी कर क्षेत्रातील व्यावसायिक संधी यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्रो.(डॉ) संतोष पगारे यांनी वाणिज्य मंडळाच्या वतीने वर्षभर राबवित असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देतांनाच आयोजित कार्यक्रमाचा उद्देश्य स्पष्ट केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. रवींद्र जाधव यांनी तर आभार प्रा. मुकेश माळवदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीसाठी प्रो. (डॉ) एस. एल. अरगडे, प्रा. अजित धनवटे, प्रा. सोनाली आव्हाड, प्रा. स्वागत रणधीर यांनी विशेष प्रयत्न केले. या मार्गदर्शन सत्रासाठी वाणिज्य शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
