
कोपरगाव प्रतिनिधी:-शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडविण्याच्या भूमिकेतून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ बनविण्यात आले आहे. या धोरणातील विविध बाबींची माहिती विद्यार्थी, पालक व समाजातील सर्व स्तरांना व्हावी, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांनी २४ ते २९ जुलै या कालावधीत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह’ आयोजित करण्याचे घोषित केले. त्यानुसार येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयातही हा सप्ताह मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या सप्ताहात महाविद्यालयाद्वारे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तर सप्ताहाचा समारोप मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख व नॅक कोऑर्डिनेटर डॉ. गणेश वाघ यांच्या व्याख्यानाने करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी भूषविले.
आपल्या उद्बोधनपर व्याख्यानात डॉ .गणेश वाघ यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्वरूप, त्यातील अभ्यासक्रम, , मूल्यमापन, विद्यार्थी व शिक्षकांची जबाबदारी, आव्हाने आणि संधी अशा विविध बाबींची सविस्तर माहिती दिली. मार्मिक व्हिडिओचा आधार घेत केलेले त्यांचे हे विवेचन सर्वांनाच प्रभावित करणारे झाले. विद्यार्थी व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही डॉ. वाघ यांनी दिली. डॉ. सानप यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की,नवीन शैक्षणिक धोरण हे बदलत्या युगाची गरज असून त्याचा सकारात्मवृतीने सर्वच घटकांनी स्वीकार व अभ्यास करण्याची गरज आहे.
सदर व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सप्ताहाचे आयोजन वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वैशाली सुपेकर व डॉ.सीमा चव्हाण यांनी केले. उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सप्ताहात आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्साहाने व मोठ्या हिरीरेने सहभाग नोंदवला. समारोप प्रसंगीही विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच महाविद्यालयातील कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर,आय.क्यु.ए.सी. कॉर्डिनेटर डॉ . निलेश मालपुरे,कार्यालयीन अधीक्षक व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक या प्रसंगी उपस्थित होते.
