माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेणार:- शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर…

Uncategorized

कोपरगांवात कारगिल विजय दिवस साजरा
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- देशासाठी समर्पण भावनेने काम केलेल्या सैनिकांच्या प्रश्नांविषयी शासन सकारात्मक आहे. सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिबीर घेण्यात येईल. अशी ग्वाही शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी आज येथे दिली.


भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर आणि सूर्यतेज संस्था, कोपरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी सैनिक आर. बी. तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान, कोपरगांव व माजी सैनिक कोपरगांव यांचे सहकार्यातून कोपरगाव येथे २६ जुलै २०२३ रोजी कोपरगावातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे कारगिल विजय दिवसानिमित्त एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. आहेर बोलत होते.
श्री.आहेर म्हणाले, कोपरगाव व राहाता परिसरातील माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ५ ऑगस्ट रोजी कोपरगाव येथे शिबीर आयोजित करण्यात येईल. या शिबिराच्या माध्यमातून समस्या सोडविण्यात येतील.
प्रारंभी भारतमाता प्रतिमा पूजन आणि अमर जवान स्मृती प्रतिकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.


या प्रसंगी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, पोलीस उप अधीक्षक संदिप मिटके, प्रभारी तहसीलदार विकास गंबरे , कोपरगांवचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, कारगिल युध्दात सहभागी सुभेदार यमाजी चेडे, सुभेदार राजेश धुमाळ,‌नायक सुभाष खिलारे, हवालदार बाळू तुजारे, हवालदार बाळासाहेब ढवळे, हवालदार देविदास गवांदे,हवालदार गहिनीनाथ पोकळे, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके, प्रभारी क्षेत्रिय प्रचार अधिकारी पी. फणिकुमार, शिर्डी माहिती अधिकारी सुरेश पाटील, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,आत्मा मालिक क्रीडा व शैक्षणिक संकुलाचे हेमाकांत पाटील,श्री. गो. विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,
एक्स सर्व्हिसमन असोसिएशनचे युवराज गांगवे, मारुती कोपरे, भाऊसाहेब निंबाळकर,संदिप चोळके आदी उपस्थित होते.


उपस्थित मान्यवर आणि कारगिल युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या वीर जवान यांचे स्नेहवस्र, सन्मानपत्र आणि झाडाचे रोप देवून सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले सुभेदार यमाजी चेडे यांनी कारगिल युद्धातील अनुभव आणि प्रसंगाचे वर्णन केले.
शारदा संगीत विद्यालयाचे केतन कुलकर्णी, सौ. दिपाली कुलकर्णी व त्यांचे सहकारी बालकलाकारयांनी देशभक्तीपर गिते सादर केली. श्री. गो. विद्यालयाच्या विद्यार्थींनी ‘संदेसे आते है’ या गीतावर समुह नृत्य सादरीकरण केले. कारगिल दिवस या विषयावर चित्रकला स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. कारगिल युध्दाचे प्रसंग वर्णन असणारी चलचित्रफित प्रदर्शित करण्यात आली.


उपस्थितांचे स्वागत प्रभारी क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. फणिकुमार यांनी तर सूत्रसंचालन सौ. वासंती गोंजारे यांनी केले. आभार सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी मानले.
कार्यक्रमात आत्मा मालिक एन. डी. ए.अॅकेडमी, एस.एस.जी.एम.महाविद्यालय,
श्री. गो. विद्यालय, सेवा निकेतन विद्यालय, शारदा इंग्लिश मेडिअम स्कूल,संत ज्ञानेश्वर इंग्लिश मेडिअम, के. बी. पी. विद्यालय यांचे एन. सी. सी. चे विद्यार्थी यांनी सहभागी झाले.

सहभागी विद्यार्थी यांनी हातात तिरंगा घेऊन ‘भारतमाता की जय, वंदे मातरम्’ घोषणा देत वातावरण देशभक्तीमय केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *