
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावातच नाही नगर जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे डॉक्टर.शेखर फडके यांचे पिताश्री व ख्यातनाम डॉक्टर.अंजली फडके यांचे सासरे वसंतराव फडके वय (93) यांचे नुकतेच कोपरगाव येथे दुःखद निधन झाले भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.
भाऊ, (स्व.वसंतराव) हे हाडाचे शेतकरी ! वाड-वडीलांकडून शेतीचा वारसा त्यांना मिळाला “शेती”हा त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य व आवडीचा विषय ! म्हणून शेती या विषयातच शिक्षण करून पदवी घेतली !आपल्या ज्ञानाचा उपयोग शास्त्र शुद्ध शेती करण्यात वापरला स्व. भाऊंनी शेतीत अनेक नवे नवे प्रयोग केले,विविध पिकांची शेती करून व मातीचा अभ्यास करून शेतीतील उत्पन्न कसे वाढवावे याचा अभ्यास त्यांनी केला व इतर शेतकऱ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले !
आज शेतकरी म्हणतात शेतीत दम नाही शेती परवडत नाही त्यांनी शास्त्र शुध्द पद्धतीने शेती करून शेतीतील उत्पन्न वाढून दाखवले शेतकऱ्यांपुढे एक आदर्श ठेवला !
स्व.भाऊंना त्यांच्या आयुष्यात त्यांची धर्मपत्नी सौ.विमलताई यांची अखंड साथ मिळाली स्वर्गीय भाऊ अत्यंत विनोदी स्वभावाचे ! व मिश्किल अर्थपूर्ण बोलणे म्हणजे एक महफिल असायची.
माझ्या दुकानात नेहमी गप्पा मारायला यायचे, वयाचे अंतर न ठेवता माझ्याशी बोलायचे काय नारायणशेठ काय म्हणतात तुमचे कोल्हे साहेब ! हा त्यांचा नेहमीचा प्रश्न ! भाऊंचे कोल्हे साहेबांचे शिक्षण एकत्र पुणे येथे झाले असे ते म्हणायचे कोल्हे कुटुंब या विषयी भाऊंना विशेष प्रेम होते.
भाऊंच्या निधनाने कोपरगावातील एक “कर्तबगार” शेतकरी,एक शेतीनिष्ठ शेतकरी,एक प्रगतीशील शेतकरी,आधुनिक शेतकरी,आपल्यातून हरपला याचे दुःख नेहमीच प्रत्येक कोपरगावकरांना राहील.
स्वर्गीय भाऊंना तीन आपत्य आपल्या परिचयाचे डॉक्टर.शेखर तसेच शिरीष शशांक इंजिनिअर मुले त्यांच्या सूनाही उच्चशिक्षित आहे आता नातूही उच्च शिक्षण घेत आहे.अशा कोपरगावातील उच्चशिक्षित व संस्कार कुटुंब म्हणून फडके कुटुंब ओळखले जाते.
डॉक्टर.शेखर फडके डॉक्टर सौ.अंजली फडके यांनी आपल्या गोड व आदरतीत्य स्वभावाने कोपरगावकरांची मने जिकली आहे.
आठवडे बाजारासारखी गर्दी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेहमीच असते हे या डॉक्टर दापत्याचे स्वभावाचे व हात गुणांचे लक्षणच आहे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे डॉक्टर काबरा यांनी स्वर्गीय भाऊंच्या निधनाबद्दल माझ्याकडे खूपच दुःख व्यक्त केले.
भाऊंना माझ्या अग्रवाल परिवाराच्या वतीने व कोपरगावातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो -नारायण शेठ अग्रवाल कोपरगाव.
मो.9822630330
