सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना व्यापारी महासंघाचे नम्र आवाहन…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपरिषदेतील विविध कामांना , सध्या सुरू असलेल्या मतभेदांमुळे ब्रेक लागला असून त्यामुळे शासनाने पाठवलेला निधी परत जाईल व शहराची विकास कामे न होता सर्व नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
म्हणून ::
व्यापारी महासंघ एक सूचना करू इच्छितो .
शहरातील कामे मार्गी लावण्यासाठी एखादी सर्वसमावेशक बैठक आयोजित करावी.

या बैठकीसाठी ,
मा. आमदार श्री आशुतोषदादा काळे,
माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे ताई , मा.नगराध्यक्ष श्री विजयराव वहाडणे , सर्व नगरसेवक , प्रशासकीय अधिकारी , पत्रकार संघ ,
शहरातील काही जाणकार व सिनियर नागरिक जसे ऍड जपे साहेब , बिल्डर प्रसाद नाईक , डॉ हुसळे ,कैलास शेठ ठोळे, श्री दिलीपराव वाघ ,जेष्ठ नागरिक मंच , लायन्स क्लब , मुंबादेवी मंडळ यांचे सह आणखी काही नागरिकांनाही यात सहभागी करून घेऊन सामंजस्य बैठक आयोजित करावी असे आवाहन व्यापारी महासंघ करीत आहे .
तरी याबाबत गांभीर्याने विचार करून संबंधित सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा ही विनंती .
-आपले नम्र –
कोपरगाव ता.व्या.महासंघ
कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *