
कोपरगाव प्रतिनिधी:-
गाव आता करता सतत झटत असताना ज्यांच्या कार्यातुन गावाबद्दल ची तळमळ आणि अधोगतीच्या कोंडीतून विकासाची सुटकेची मागणी करणारे दोन कर्तृत्ववान युवा पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रविंद्र जगताप आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे हे खरे कोपरगांव जिल्ह्याच्या मागणीचे खरे शिल्पकार…
आहे हे कोणाला हि सत्य डावलता येऊ शकत नाही कारण आज हि संगमनेर श्रीरामपुर जिल्ह्याकरता आंदोलन होत असतांनाच कोपरगाव जिल्हा कृती समिती फक्त यावर बोलते तसेच यापुर्वी हि कोपरगाव जिल्हा विषयावर कोणी बोलण्याच धारीष्ट दाखवत नव्हतं त्यांव्हा कोपरगाव विकासाच्या चळवळीतील महत्वाचे घटक सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे व रविंद्र जगताप यांनी कोपरगांव जिल्हा कृती समिती स्थापन केली आंदोलन केली कोपरगावची बलस्थान सर्वांसमोर प्रशासना समोर आणली आणि सतत आजवर निरंतर आपला लढा सुरू ठेवला या लढ्यास सुरुवात करतांना गावकऱ्यां कडुन विचारणा होत कोपरगावात काय आहे .
या प्रश्नाची उत्तरं शोधुन प्रशासनाला कोपरगावात काय आहे हे पटवुन देऊन सतत च्या पाठपुराव्याला यश येऊन प्रशासनाने कोपरगाव जिल्हा कृती समिती संग पत्र व्यवहार केला अगदी हा पाठपुरावा इतका सक्षम होता की तत्कालीन राष्टपती श्री प्रणव मुखर्जी यांनी या पाठपुराव्याची दखल घेऊन संबधित प्रशासनाला हा विषय निकाली काढण्याचे आदेश केले पण तेव्हाच निवडणुका लागण्या आणि अ.नगर जिल्हाच विभाजन या शिल्पकारांनी केलेल्या पाठपुराव्याने होता होता माग पडल
ज्या काळात कोपरगावातील प्रस्थापित गावांसाठी धजत नव्हते तेव्हा या युवकांनी खिंड लढवली आणि गड आला पण सिंह गेला निवडणुकाने हा विषय मागे पडला सरकार बदलले सत्ता संघर्ष सुरू झाले कोरोनाने लाॅकडाऊनची कुऱ्हाड जनमानसावर कोसळली पण या समस्त जग बंद असतांना कोपरगाव जिल्हा कृती समिती कधी थांबलीच नाही आपला पाठपुरावा कधी बंद केलाच नाही
जिल्हा विभाजन संघर्षात आम्ही कसे सरस हे मांडत सदैव आपल्या मातृभुमी करता निस्वार्थ उभे राहीले जे दिग्गजांनी केलं नाही ते यांनी करून दाखवलं आणि
कोपरगाव जिल्हा मागणी करत कोपरगांव जिल्ह्याकरता कसं सरस उजव आहे दाखवुन दिले
कोपरगावला 5000 वर्षाचा इतिहास आहे हे जगासमोर प्रशासना समोर वारंमवार मांडलं
या युवकांनी पुढाकार घेत गावभर कोपरगांव जिल्ह्याकरता सर्वांनी एकत्र येण्याकरीता बॅनर लावत जाहीर आवाहन केलं
आणि जिल्हा मागणीला एकाएकी लढा दिला कोपरगाव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी करून सर्वांनमते कोपरगाव जिल्हा झालाच पाहिजे म्हणुन ठराव करून घेतला
काकडी विमानतळ कोपरगाव शहरात आहे हे कित्येकांना माहित हि नव्हते कोपरगाव जिल्हा आणि काकडी विमानतळ नामविस्तार यावरही स्वाक्षरी आंदोलन करून असंख्य नागरीकांच्या सह्या गोळा करत प्रशासनाला पाठवल्या आणि कोपरगाव जिल्हा व काकडी विमानतळ हा संवेदनशील विषय शासनदरबारी मांडला आज हि कोणी असो अथवा नसो पण कोपरगांव जिल्हा व काकडी विमानतळ नामविस्तार या करता सततचा शासन दरबारी पाठपुरावा चालु आहे कोपरगाव जिल्हा ह्या मागणीचे व काकडी विमानतळ नामविस्तार करण्याच्या मागणीचे खरे शिल्पकार कोपरगाव जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष रविंद्र जगताप आणि सचिव किशोर चोरगे आहेत
यात काहीच शंका नाही हे निर्विवाद सत्य सर्वांना मानावेच लागेन .कोपरगाव जिल्हा मुख्यालय होण्यासाठी सर्वानी पुढाकार घेतला पाहिजे.
दिलीप घुमरे
उपाध्यक्ष
जयहिंद विचार मंच
