
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्याही
धोकादायक वेगाने वाढत आहे.नागरिकांनी शासनाने वारंवार दिलेल्या
सूचना,नियम अमलात आणणे गरजेचे आहे.मास्कचा वापर,वारंवार हात व परिसर
स्वच्छ ठेवणे,सुरक्षित अंतर ठेवणे,गर्दि टाळणे,गर्दि होईल असे कुठलेही
कार्यक्रम टाळणे,सॅनिटायझरचा वापर याबाबत काहीजण अजूनही गंभीर नसल्यानेच
कोरोनाचा धोका वाढतो आहे.
खरे तर आपण-नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने आठवड्यातून एक
दिवस लॉकडाऊन करायला हरकत नाही.व्यवसाय करण्याच्या वेळा कमी करूनही आपण
स्वतःचा काही प्रमाणात कोरोनापासून बचाव करू शकतो.प्रत्येकास आर्थिक
अडचणी असतातच,पण जीवितही महत्वाचे आहे.आतापासूनच आपण असे उपाय योजले तर
अनेक दिवस लॉकडाऊन करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.
असे कराच असे मी म्हणणार नाही,सर्वांनी मिळून निर्णय
घ्यायला पाहिजे.कारण मागच्या वर्षी आम्ही असा प्रयत्न केला. त्यावेळी
काहीजण गोरगरिबांचा फारच कळवळा आहे असे दाखविण्यासाठी
आमच्यावर,प्रशासनावर टिका टिप्पणी करण्यात धन्यता मानू
लागले.नागरिकांच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी सर्वजण मिळून निर्णय
घ्यावा.प्रत्येक वेळी राजकिय विचार करू नये. आपल्यापैकी कुणावरही
कोरोनाचे संकट कोसळू नये यासाठी लहान मोठ्या व्यापारी संघटना, सामाजिक
संघटना,समाजसेवक,सर्वपक्षीय यांनीच निर्णय घ्यायला पाहिजे
विजय वहाडणे…
