
कोपरगाव प्रतिनिधी:- नुकतेच मराठा उद्योजक लाँबीची कार्यकारणी जाहीर झाली असून या उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी संतोष कुटे यांची निवड करण्यात आली आहे तर सहसंपर्कप्रमुख पदी राहुल उर्फ ज्ञानेश्वर आढाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे


कोपरगाव तालुक्यातील संतोष कुटे आणि राहुल उर्फ ज्ञानेश्वर आढाव यांनी कोपरगाव तालुक्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसाय उद्योगाद्वारे रोजगार मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात कोपरगाव मध्ये मराठा समाजाच्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात कोपरगाव मध्ये मराठा विकास फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी कोपरगाव तालुक्यामध्ये उत्कृष्ट असे काम केले आहे. ते नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतात त्यांच्या या कामाची दखल करून संतोष कुटे यांना मराठा उद्योजक लाँबीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे तर राहुल आढाव यांची सहसंपर्कप्रमुख पदि नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
