साखर आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्यावतीने स्वागत…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनीधी:-
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त साखर आयुक्त म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकताच पदभार स्विकारल्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी साखर संकुल पुणे येथे नुकतेच स्वागत केले.
याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या साखर उद्योगाबाबत विविध मुददयावर भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा नावलौकीक असून देशपातळीवर सर्वप्रथम औषध निर्माती क्षेत्रात कारखान्याने यशस्वी पदार्पण केले असुन पॅरासिटामॉल या औषधाची निर्मीती केल्याची माहिती देवून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना भावी वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे व संचालक मंडळातील सर्व सदस्यांच्यावतीने कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनीही साखर आयुक्तांना सदिच्छा दिल्या.

फोटोओळी:-कोपरगांव-
साखर आयुक्त म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकताच पदभार स्विकारल्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी पुणे येथे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *