संजीवनी ज्यु. कॉलेजची अफशिन नीट परीक्षेत ९९. ७३ पर्सेन्टाईल मिळवुन तालुक्यात प्रथम, संजीवनीच्या यशस्वी वाटचालीत अधिकचा मानाचा तुरा….

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:- वैद्यकिय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा ( नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट-नीट यूजी २०२३) परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला असुन यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्याुटस संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजची विध्यार्थिनी अफशिन रियोजोद्दीन शेख हिने ७२० गुणांपैकी ६५६ गुण म्हणजे ९९. ७३ पर्सेंटाईल मिळवुन कोपरगांव तालुक्यात सर्व प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळविला, अशी माहिती कॉलेजच्या वतीने देण्यात आली आहे.
देश पातळीवर २०,३८,५९६ विध्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यातुन अफशिनचा देश पातळीवर५३१५ गुणानुक्रमांक आहे. याच परीक्षेत संजीवनीच्या मोनिका लाडुराम बिश्णोईने ९७.४४, हर्षल वाल्मिक निळकंठने ९७. ०३, पांडुरंग शिवाजी कोळपे याने ९६. ५१, तेजस विकास चौधरी व महिमा महेश वहाडणे यांनी प्रत्येकी ९३. १५, सायली संजय कोरडे हीने ८६. ८६ व गौरी विक्रम भोरकडे हीने ८४. ८३ पर्सेन्टाईल गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले.
इ. १२ वीचा १०० टक्के निकाल, विध्यार्थ्यांचे एमएचटी-सीईटी व नीट मधिल यश आणि ज्युनिअर कॉलेजच्या विध्यार्थ्याचे विविध पातळीवर विविध क्षेत्रातील यश या सर्व बाबींमुळे संजीवनी ज्युनिअर कॉलेजने नावलौकिक प्राप्त केला आहे. विध्यार्थ्यांच्या या यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यानी सर्व गुणवंत विध्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन केले आहे तसेच प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे व त्यांच्या सर्व टीमचेही अभिनंदन केले आहे.
अफ्षीलची प्रतिक्रीया
‘एमबीबीएस ला प्रवेश मिळवुन गोरगरीब रूग्नांची सेवा करावी, ही माझ्या आई वडीलांची शिकवण होती. परंतु त्यासाठी नीटची पात्रता परीक्षा पात्र होणे गरजेचे असते. मोठ्या शहरात जावुन अथवा इतरत्र खाजगी शिकवणी लावणे मला शक्य नव्हते. म्हणुन माझ्या आई वडीलांना अभ्यास केला की कोणत्याही ही खाजगी शिकवणीला न जाता, नीटचे मार्गदर्शन कोणत्या कॉलेजमध्येच मिळेल, याचे उत्तर आम्हाला मिळाले ते म्हणजे संजीवनी ज्युनिअर कॉलेज. आणि खरोखरच ते सत्यात उतरले आणि मला ९९. ७३ पर्सेन्टाईल मिळाले. आता मी माझ्या आई वडीलांचे व माझेही स्वप्न पुर्ण करू शकणार आहे, हे केवळ संजीवनीमुळेच शक्य झाले’-अफ्षील शेख.

फोटो:- प्राचार्य डॉ. आर. एस. षेंडगे यांनी अप्षील षेखच्या नीट परीक्षेतील उत्तु्र यषाबध्दल तिच्या आई वडीलांसमवेत सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *