



कोपरगाव प्रतिनिधी:-
विद्यार्थ्यांचे प्रेम, निरोपाची फ्रेम शालेय निरोप समारंभ म्हणजे आठवणी ठेवून जाणे व आठवणी घेऊन जाण्याचा अविभाज्य भाग! नुकताच कोपरगाव नगरपालिका शाळा नं.५, बेट येथे इयत्ता सातवीच्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनीच बालसभा आयोजित करून केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास माळी हे होते.

विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट, मंच सजावट केली. प्रथमत :कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली रक्ताटे हिने केले. साक्षी गोधडे, तन्वी कर्डीले, अथर्व ठोंबरे,अंजली रक्ताटे, योगेश परदेशी, मोनाली पिंपळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थी या प्रसंगी शाळा सोडण्याच्या विचाराने भावुक झाले होते. श्री सुनिल रहाणे यांनी आपले मनोगतात विद्यार्थ्यांना प्राप्त केलेल्या ज्ञानाचा जीवनात समाजासाठी उपयोग करणे , मुलींनी पदवीपर्यंत शिक्षण घेणे या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच वर्गशिक्षिका श्रीमती नसरीन इनामदार यांनीही विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेत गुण मिळावीने हा हेतू न ठेवता उत्कृष्ठ नागरिक बनावे असे प्रतिपादन केले. श्री अमोल कडू यांनीही विदयार्थ्यांच्या अनेक आठवणी जागृत केल्या.अध्यक्षीय भाषणात श्री विलास माळी यांनी प्रत्येक विद्यार्थ्यामधील गुण हेरून त्याबाबतीत भविष्यात शिक्षणाबाबत व व्यावसायिक वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या सुख- दुःखाच्या समिश्र अशा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सुखद धक्का दिला तो “निरोपाची फ्रेम ” देऊन! या फ्रेम मध्ये शालेय जीवनातील सहल, क्षेत्र भेट, सांस्कृतिक कार्यक्रम यातील दुर्मिळ फोटोचे संग्रह आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. साक्षी गोधडे व आभार अथर्व ठोंबरे याने मानले.

