आ. आशुतोष काळेंनी कोपरगाव रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटले:-दिनार कुदळे…

Uncategorized

रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांना सातत्याने येत असलेल्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटले असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे यांनी सांगितले असून रेल्वेने नियमित प्रवास करणारे प्रवासी व रेल्वेने शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असल्याचे दिसून येत आहे.
कोपरगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांना मागील काही वर्षापासून इतर रेल्वे स्टेशनप्रमाणे आवश्यक सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण होते. याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या समस्या जाणून घेतल्या. मागील वर्षी २५ फेब्रुवारी रोजी रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी कोपरगाव दौऱ्यावर आले असता त्यांच्यापुढे या समस्या मांडतांना कोपरगाव रेल्वे स्टेशनवर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारावा.कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॉटफॉर्म नंबर ३ ला लुक लाईन करणे व रुंदी वाढवावी. कोपरगांव रेल्वे स्टेशनला मंजूर असलेल्या लिप्टचे काम तातडीने सुरु करावे. कांद्यासह जास्तीत जास्त शेतीमाल परराज्यात विक्रीसाठी पाठविणे साठी कोपरगांव स्टेशन जम्बो साईडिंगला लुक लाईनमध्ये वर्ग करून कोपरगांव रेल्वे स्टेशन येथे जम्बो गुड्स शेड मंजूर करावे. प्रस्तावित यशवंतपूर-निजामाद्दीन-राजधानी एक्सप्रेसला दौंड-मनमाड मार्गे वळवून कोपरगांवला थांबा द्यावा. दुरांतो एक्सप्रेस-गरीब रथ एक्सप्रेस-हमसफर एक्सप्रेस-संपर्क क्रांती एक्सप्रेस-शिर्डी कालवा एक्सप्रेस यांना कोपरगांव येथे थांबा द्यावा. लिफ्ट अभावी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सांगत कोपरगांव रेल्वे स्टेशनला मंजूर असलेल्या लिप्टचे काम तातडीने सुरु करावे तसेच प्रस्तावित कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनच्या मागील चार वर्षापासून सुरु असलेल्या सर्व्हे तातडीने पूर्ण करावा आदी समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या पाठपुराव्यातून कोपरगाव रेल्वे स्टेशनवरील लिफ्टचे काम पूर्ण झाले आहे. एक्स्ट्रा ट्रॅक साठी तीन नंबर प्लॅटची निर्मितीची केलेली मागणी पूर्ण झाली असून हे काम देखील पूर्ण झाले आहे. अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून स्वच्छतेचा प्रश्न देखील सुटला आहे. नवीन डोम बांधण्यात आले आहेत. अशा अनेक सोयी सुविधा रेल्वे प्रवाशांना कोपरगाव रेल्वे स्टेशनवर मिळत आहेत. त्यामुळे साई भक्त तसेच कोपरगाव वरून उद्योग व्यवसायासाठी पुणे, मुंबई व मोठ्या शहरात नियमित रेल्वेने प्रवास करणाऱ्या व्यावसायिकांना आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतील मोठ्या शहरातील रेल्वे स्टेशनवरील अद्यायावत सोयी-सुविधा कोपरगाव रेल्वे स्टेशनवर देखील रेल्वे प्रवाशांना मिळत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे.
आ.आशुतोष काळे यांना कोपरगाव रेल्वे स्टेशन सर्वच बाबतीत कायमस्वरूपी परिपूर्ण करायचे आहे. त्यासाठी त्यांनी अमृत भारत स्टेशनमध्ये कोपरगाव व साई नगर शिर्डी रेल्वे स्टेशनचा समावेश व्हावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली आहे. या मागणीला रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. या मागणीची रेल्वे मंत्रालयाकडून पूर्तता झाल्यानंतर एक ब्रिज व एक भुयारी मार्ग होणार आहे. सर्व सुविधांयुक्त कर्मचारी वसाहत, अंतर्गत रस्ते, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, ट्रान्सपोर्ट पार्किंग, स्टेशन विस्तारीकरण व पुनर्विकास होणार आहे. नवीन रेल्वे गाड्यांना कोपरगाव रेल्वे स्टेशनवर थांबा मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढणार असून कोपरगावच्या बाजार पेठेवर परिणाम होवून आर्थिक व्यवसाय वाढीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हातभार लागणार असल्याचे दिनार कुदळे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *