अवघ्या पाच वर्षाच्या मुलींने केला पवित्र रमजान महिण्याचा रोजा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात हिंदू मुस्लिम बांधवात सर्वांच्या आवडीचे नेते माजी नगरसेवक हाजी मेहमूद भाई सय्यद यांची नात व सागर सय्यद यांची मुलगी अर्श वयाच्या 5 व्या वर्षी शुक्रवार दि.7 एप्रिल 2023 रोजी तिने रमजान महिन्याचा पहिला रोजा पूर्ण केला. रोजा अर्शने पूर्ण केल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. रमजानचा रोजा पानी जेवन आहार काहीच न घेता पूर्ण केला जातो आणि हा रोजा अर्श ने पूर्ण केल्याने कुटुंबाच्या सर्व सदस्य कौतुक केले आहे.गांधीनगर व साईनगर भागामधील सर्व मित्र मंडळ यांनी त्या लहान मुलीचे कौतुक केले आहे. यावेळी रोजा इफ्तारी करतांना तिच्या कुटुंबियांनी अर्शचे अनोख्या पद्धतिने स्वागत केले.तर मुस्लिम धर्मगुरू व बांधवांनी अर्शचे या रोजाला अल्लाह अर्थात ईश्वराने कबूल करावे अशी दुआ व प्रार्थना देखील केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *