
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज कोपरगांव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मोदी सरकारने लागू केलेल्या कृषि कायद्याविरोधात तालुका तहसील कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी वंबआ अहमदनगर (उत्तर) चे जिल्हा सल्लागार मा. शरदभाऊ खरात, व कोपरगांव तालुकाध्यक्ष रणजित खरात यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले..
कृषि कायदे शेतकर्यांसाठी किती निकामी आणि घातक आहे हे आवर्जून सांगण्यात आले..
जोपर्यंत देशाचा शेतकरी आपल्या हक्कासाठी राजधानीवर आंदोलन करत ठाम असतील तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आपल्या शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन देण्यात आले, व तहसीलदार साहेबांना असे निवेदन देण्यात आले..

यावेळी शरद खरात अहमदनगर (उत्तर) चे जिल्हा सल्लागार, राजु जाधव शहराध्यक्ष,
प्रकाश कदम, संजय कोपरे उपशहराध्यक्ष,
तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
