माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:६
माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचा वाढदिवस मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने मतदार संघातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालय येथे पाठपुरावा करून मतदार संघातील दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. आॅनलाईन उपलब्ध झालेल्या प्रमाणपत्राचे वाटप दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग सेलचे उपाध्यक्ष संदीप शहाणे, सचिव जयवंत मरसाळे, अल्पसंख्याक सेलचे खलीकभाई कुरेशी, फकिरमंहमद पहिलवान यावेळी उपस्थित होते.
माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांनी नेहमीच समाजातील तळागाळापर्यंतच्या घटकापर्यंत काम करीत आहे. त्यांचा आदर्श घेउनच आम्ही काम करत असुन त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवाना प्रमाणपत्राचे वाटप केल्याने आमचा आंनद द्विगुणित झाला आहे. असे तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे यांनी सांगितले. शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार दिव्यांग सेलचे सचिव जयवंत मरसाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *