कोपरगावच्या वैभवात भर टाकणार:- आ.आशुतोष काळे ; पिपल्स बँकेच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालकांचा आ. आशुतोष काळेंच्या हस्ते सत्कार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने व व्यापारी बांधवांच्या सहकार्यामुळे मी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा आमदार झालो असून व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवून कोपरगावच्या वैभवात भर टाकणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.
कोपरगाव पिपल्स बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन कैलास ठोळे व व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोहकरे तसेच संचालकांचा आ. आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,मागील काही वर्षापासून काहीशी ओस पडलेली कोपरगावची बाजारपेठ पुन्हा फुलविण्यासाठी कोपरगाव शहराच्या विकासाला वैशिष्ठ्यपूर्ण योजनेअंतर्गत जवळपास १८ कोटी निधी दिला आहे. या निधीतून कोपरगाव शहरातील प्रमुख रस्ते,शासकीय इमारती, नगरपालिका इमारत,स्मशानभूमी,प्रत्येक प्रभागातील अंतर्गत रस्ते तसेच सर्व समाजाच्या समाज मंदिरांची कामे मार्गी लागली आहेत.कोपरगाव शहराच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी १३१.२४ कोटी निधीतून ५ नंबर साठवण तलावाचे काम प्रगतीपथावर आहे.साठवण तलावाचे काम लवकरच पूर्ण होणार असून नागरिकांना नियमित पाणी देण्याचा प्रयत्न आहे. कोपरगाव शहराच्या मुख्य समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. कोपरगाव शहरात पुन्हा नागरिक खरेदीसाठी येवू लागल्यामुळे साहजिकच व्यापाऱ्यांपुढे असणाऱ्या अडचणी काहीशा कमी झाल्या आहेत. मात्र यावर थांबून चालणार नसून येत्या काळात कोपरगावच्या वैभवात अधिक भर टाकून गेलेले कोपरगावचे वैभव परत आणायचे आहे त्यासाठी व्यापारी बांधवांचे देखील सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पद्माकांत कुदळे, ज्योती पतसंस्थेचे संस्थापक रवीकाका बोरावके, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नवनिर्वाचित संचालक राजेंद्र शिंगी, वसंतराव आव्हाड, रविंद्र लोहाडे, अतुल काले, मोहित गंगवाल, सुनील बंब, सत्येन मुंदडा, सुनील बोरा, दिपक पांडे, हेमंत बोरावके, सौ.त्रिशला गंगवाल, सौ. प्रतिभा शिलेदार आदींसह माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, जनरल मॅनेजर दिपक एकबोटे, असिस्टंट मॅनेजर जितेंद्र झाजेड आदी उपस्थित होते.
चौकट – आ.आशुतोष काळे उच्च विद्या विभूषित असून त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे कोपरगावच्या विकासाची गती वाढली आहे.त्यांनी तीन वर्षात कोपरगाव शहरासह मतदार संघाच्या विकासाला गती देवून अल्पावधीत विकास साधला आहे.त्यामुळे त्यांच्या रूपाने कोपरगाव मतदार संघाला गतिमान आमदार लाभला आहे.- कैलास ठोळे (चेअरमन पिपल्स बँक)

फोटो ओळ:- कोपरगाव पिपल्स बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन कैलास ठोळे व व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोहकरे व संचालकांचा सत्कार करतांना आ.आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *