
कोपरगाव प्रतिनिधी:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती आज रविवारी (१९ फेब्रुवारी) कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. बिपीनदादा कोल्हे यांनी आज कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकस्थळी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत त्यांना विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्थित सर्व शिवभक्त, शिवप्रेमी नागरिकांना त्यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरगाव शहरात शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती. सर्व परिसर भगवामय झालेला दिसून आला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्त, शिवप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. बिपीनदादा कोल्हे यांनी सकाळी अकराच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.


याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेशराव घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, बापूसाहेब बारहाते,अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, कोपरगाव नगरपालिकेतील भाजपचे माजी गटनेते रवींद्रअण्णा पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,माजी नगरसेवक बबलूशेठ ऊर्फ नयनकुमार वाणी, आरपीआयचे नेते दीपकराव गायकवाड, जितेंद्र रणशूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक,माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, माजी नगरसेवक जनार्दन कदम, विवेक सोनवणे, किरण सुपेकर,अशोकराव लकारे, रवींद्र रोहमारे, जयप्रकाश आव्हाड,दीपक जपे,सचीन सावंत,प्रसाद आढाव, जगदीश मोरे, गोपीनाथ गायकवाड, खालिकभाई कुरेशी, अकबर लाला शेख, संतोष साबळे, सतीशराव रानोडे, चंद्रकांत वाघमारे, विष्णुपंत गायकवाड,विजय गायकवाड, शफिकभाई सय्यद, आसिफभाई शेख, अनिल गायकवाड, विजय चव्हाणके, रुपेश सिनगर, सागर जाधव, वसिम पटेल, शंकर बिऱ्हाडे, रामचंद्र साळुंके, सतीश चव्हाण, अर्जुन मरसाळे, अल्ताफभाई कुरेशी, गोपीनाथ सोनवणे, मुक्तार शेख, नीलेश डोखे, ज्ञानेश्वर जाधव, रोहन दरपेल, सलीम पठाण, योगेश शिरसे, फकीर मोहम्मद पहिलवान आदींसह भारतीय जनता पक्ष, भाजयुमो, संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्त आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त सेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास बिपीनदादा कोल्हे यांनी भेट देऊन या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. सेवा फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराचे यंदाचे चौथे वर्ष आहे. यावेळी भाजपचे नगर परिषदेतील माजी गटनेते रवींद्रअण्णा पाठक, अल्ताफभाई कुरेशी, खलीकभाई कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, सागर जाधव, रोहन दरपेल आदींसह सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष जुनेदभाई शेख, उपाध्यक्ष हाफीजभाई शेख, फिरोज पठाण, आसिफ मणियार, इरफान तांबोळी, मतीन चोपदार, अलाउद्दीन शेख आदींसह सेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांचे जीवनकार्य येणाऱ्या प्रत्येक पिढीला कर्तव्याची जाणीव करून देणारे आहे पुढे यावेळी बिपीनदादा कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे मानबिंदू, प्रेरणास्थान आणि जगातील आदर्श राजे म्हणून उर्जस्थान आहे,त्यांचे कार्य, महिमा अगाध आहे. त्यांची कीर्ती जगभरात पसरली आहे. एक व्यक्ती स्वतःच्या आत्मविश्वासातून किती असामान्य आणि परिवर्तनवादी कार्य करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. कुशल नेतृत्व, कर्तृत्व, संघटन, सावधानता हे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. शूर, पराक्रमी, उत्तम प्रशासक, कुशल संघटक, प्रजाहितदक्ष कुशल राज्यकर्ता, उदार व लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला सकारात्मक दिशा देणारे आहे. रयतेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या मनातील सुराज्य प्रत्यक्षात साकारत उत्तम राज्यकारभाराचा आदर्श जगासमोर ठेवला. शिवाजी महाराजांचे गनिमी कावा हे प्रमुख युद्धतंत्र होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने जिंकल्या. शिवाजी महाराजांनी जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. निर्भिडपणा आणि जिद्द, दूरदृष्टी, गनिमी कावा, व्यवस्थापन, न्याय आणि सर्वधर्मसमभाव, समानता, एकात्मता, स्त्रीसन्मान, आदर, रयतेच्या सुख व समाधानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे राजे म्हणून छत्रपती शिवराय यांचे जीवनकार्य येणाऱ्या प्रत्येक पिढीला आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे.
छत्रपती शिवरायांना अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण माँ जिजाऊ साहेब यांनी लहानपणापासून देत आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव वेळोवेळी करून दिली होती. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची जडणघडण झाली. आई-वडिलांकडून मिळालेली शिकवण आणि कौशल्य याचा परिपूर्ण वापर शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या मातृस्वप्नपूर्तीसाठी केला. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ स्मरणाने प्रत्येकाच्या शरीरात आणि मनात नवचेतना निर्माण होते. तर त्या काळात महाराजांच्या एका शब्दावर बलिदान देणारे हजारो मावळे किती एकनिष्ठ आणि ध्येयप्रेरित होते हे उमजते. छत्रपती शिवरायांच्या विचारांचे अनुकरण आपण सर्वांनी केले तर समाजातील अनेक चुकीच्या घटनांना आळा बसेल आणि सर्व समाज सुख, समाधान व आनंदाने जीवन जगू शकेल. छत्रपती शिवरायांचे आदर्श विचार कायम मनात ठेवून समाजाप्रती कार्य करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करणे होय, असेही बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.
