
कोपरगाव प्रतिनिधी
(वडाळा महादेव):- अहमदनगर जिल्हा परीट धोबी सेवा मंडळाचे जिल्हाअध्यक्ष तसेच मुंबादेवी तरुण मंडळ साई गाव पालखी सोहळ्याचे अध्यक्ष सुनील जनार्दन फंड यांना कार्याची दखल घेऊन आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृह याठिकाणी सदरचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीमहाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे मार्गदर्शक यादवराव पावशे अमोल शेवाळे रवींद्र पावशे रोहित पवार निलेश पावशे रवींद्र पवार बिपिन शिंदे देविदास फापाळे आधी प्रमुख उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते सुनील फंड यांना सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले कोपरगाव तसेच परिसरातील सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रात विशेष सहभाग घेऊन शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना संरक्षणाचे प्रशिक्षण आदी कार्यक्रम राबविले या कार्याची दखल घेऊन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्वानुमते श्री फंड यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या श्री फंड यांनी सर्वांचे आभार मानले
