संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४४ वी जयंती उत्साहात…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोपरगावच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शहरात क्रांतिकारी संत शिरोमणी गुरु रविदास महाराजयांची ६४४वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.


समाज मंदिरात झालेल्या जयंती कार्यक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री मा बबनरावजी घोलप यांनी केलेल्या आवहनानुसार तसेच शासनाच्या निर्देशानुसार सर्व नियम पाळत माघ पौर्णिमेला संजय कानडे यांचे हस्ते सपत्नीक पुजन करुन जयंती साजरी करण्यात आली सर्व समाज बांधवांनी दर्शन पुजन करुन आरती करुन तिर्थ प्रसाद घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मिरवणुक किर्तन तसेच प्रतिवर्षाप्रमाणे होणारा समाज मेळावा, महाप्रसाद समाजातील गुणवंत विध्यार्थी व निवृत्त कर्मचारी, आणि कोरोनायोद्द्यांचा सत्कार कार्यक्रमाबाबत परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कानडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर राज्य कार्यकारिणी सदस्य मारुती कानडे,उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीपराव कानडे,महिला राज्य कार्य सदस्या सौ, स्नेहाताई दिलीप कानडे,वसंतराव थोरात, संजय सरवार,संतोष शिंदे,भैया कानडे, तालुका कार्यध्यक्ष अँड रमेश दुशिंग यांनी मनोगत व्यक्त केले समाजातील तरुणांचे मोठया प्रमाणावर संघटन करून समाजाच्या कोणत्याही घटकावर अन्याय झाल्यास एकजुटीने मुकाबला करण्याचा ठराव करण्यात आला
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कोपरगाव तालुका अध्यक्षपदी माधव पोटे सर, युवा जिल्हा संघटक पदी संजय सरवार, शहर उपाध्यक्ष पदी संतोष दळवी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली
औद्योगिक वसाहतीचे चेअरमन तथा जिल्हा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित सदस्य मा. विवेक भैया कोल्हे यांचा चर्मकार समाज्याच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आलाा

यावेळी विद्यमान नगरसेवक व भा ज पा गटनेते मा रविंद्र पाठक, जालिंदर लगड, देविदास कानडे, जिल्हा सचिव संजय पोटे, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग शहर अध्यक्ष गणेश कानडे, तुषार पोटे, संजय कानडे, मारुती कानडे, संदेश कानडे, संकेत कानडे,, वसंत थोरात, विकास थोरात, कैलास सातपुते, बाळासाहेब बारसे, मच्छींद्र आहेर, दत्तू सातपुते, सोमनाथ रायभान, गोरख कानडे, बाळासाहेब सोनटक्के, संतोष दळवी, संतोष बारसे, कैलास बोरावके, बोबडे साहेब,
दत्तात्रय कांबळे सर, राम कानडे, भाऊसाहेबआप्पा कानडे, मारूती सरवार सर, सुभाष पोटे, संतोष कानडे, सागर पोटे, सुशांत कानडे, अनिल कानडे, गोरख कडू, किसनराव कानडे, योगेश बारसे, दिपक कांबळे, माऊली टेलर्स, सौ.संगिता भाऊसाहेब कानडे, सौ. जयश्री गणेश कानडे, सौ.सरवार, सौ. लताबाई कानडे, सौ. शिवानी कानडे, सौ. गिरजा कानडे, आदी समाज बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *