भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान यशस्वी करावे:- सौ स्नेहलता कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्ताने “हर घर तिरंगा” मोहीमेस शासनाने सुरूवात केलेली आहे, देशातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावायचे उद्दीष्ट्य शासननाने ठेवले आहे. याच अभियानामध्ये भारतीय जनता पक्ष पण सहभाग घेवुन या मोहीमीचे उद्दीष्टे पुढे घेवुन जायचे ठरवलेले आहे. तरी सर्वांनी या मोहीमध्ये सहभाग घेवुन आपण राष्ट्रध्वज दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्याने हर घर तिरंगा मोहीम राबवायची असल्याचे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केलेआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, यांनी याबाबत एक कृतीशील कार्यक्रम आखला आहे.
प्रत्येक बूथ वर तिरंगा कार्यक्रम ९ ते ११ ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभक्तीपर गीत, तिरंगा यात्रा, सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग लावून देशभक्तीचा प्रचार व वातावरण निर्मिती करावी., 11 से 13 ऑगस्ट 2022 या कालावधीत “रघुपती राघव राजाराम” भजन “वंदे मातरम्” संपूर्ण गीत लावून प्रत्येक प्रभाग व गावात प्रभात फेरी काढावी सर्व निवासी संघटना, युवा संघटना, साधु-संतांचे मत व इतर सामाजिक संघटनाच्या कार्यालयांवर राष्ट्रध्वज कार्यक्रमापूर्वी सर्वांशी संपर्क कार्यक्रमाचे नियोजन करावे, सर्व पोस्ट ऑफिस, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून चार प्रकारच्या वेबसाइटवर आणि अन्य दुकानांमध्ये उपलब्ध असेल, राष्ट्रध्वज लवकरात लवकर खरेदी करावेत तसेच नागरिकांनाही राष्ट्रध्वज खरेदी करण्यास प्रोस्ताहित करावे., युवा मोर्चा तर्फे 10, 11 आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी प्रत्येक जिल्हयात तिरंगा सायकल यात्रा काढावी, मंडल स्तरापर्यंत किमान तीन सदस्य समिती गठित करावी आणि प्रभात फेरी, तिरंगा फडकवणारे प्रत्येक घर आणि राष्ट्रध्वज यांचे फोटो व व्हिडियो सोशल मीडिया दवारे व्यापक प्रसिध्दीची योजना तयार करावी, जिल्हा, मंडल, शक्ती केंद्र व बूथ स्तरावर प्रत्येक ठिकाणी तिरंगा अभियान यशस्वी करावे,
या कार्यक्रमात पक्षाचे स्थानिक, लोकप्रतिनिधी खासदार, आमदार, नगरसवक, जि. पारषद, नगरपा मोर्चा व प्रकोष्ठ पदाधिकारी यांचा सहभाग निश्चित करावा. कार्यक्रम शांततेत व देशभक्तीच्या भावनेने आणि राष्ट्रीय अभिमानाने उत्साहपूर्वक साजरा करावा.
त्याचप्रमाणे सर्व सहकारी संस्था, औद्योगीक संस्था या सगळीकडे हर घर तिरंगा चे नियोजन ग्रामसेवक,कामगार तलाठी ,सोसायटी सचिव, चेअरमन, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, रयत शाळा मुख्याध्यापक, वायरमन ,रेशन दुकानदार ,पोलिस पाटील ,कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी ,अंगणवाडी सेविका ,आशा सेविका ,पोस्टमन ,सरपंच सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष ,महिला बचत गट अध्यक्ष, यासह सर्व आजी माजी सैनिक तसेच स्वातंत्र्य सेनानी व भारत देशावर प्रेम करणारे प्रत्येक नागरिक यांचे सहकार्य या अभियानात जाणीवपूर्वक घेण्यात यावे. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,बाळासाहेब निकोले, बापुसाहेब सुराळकर,संदिप गायकवाड, गोरखभाऊ आहेर, चंद्रकांत शिवरकर, सचिनदादा कोल्हे,सुभाष गायकवाड, संतोष सुराळकर, विजय कोर, सुरेश शिंदे, शिवाजी दवंगे, अतुल सुराळकर, अशोक भनगडे, किरण गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, रविंद्र काकड, किशोर कोल्हे, दत्तात्रय सुराळकर, भास्कर आहेर, संतोष सुराळकर, शंकर पाईक, अनिल पाईक सर, मारुती पाईक, दिपक कोल्हे, प्रदिप आहेर, उमेश कोकाटे, अमोल झावरे, उत्तम पाईक, बाबासाहेब गायकवाड, निलेश भाकरे, विजय नागरे, रमेश वाघ, पी.एस.डहाके, रामराव डुंबरे, आर.बी.निकम, वैशाली कोल्हे, वंदना गायकवाड, मोनाली आहेर , संगिता चिंचोले, उषा चिंचोले, निता गायकवाड, पी.एल.वाघ, निफाडे एस.एस., वाघ एस.आर. , निलिनी झावरे, कल्पना कळसकर, अनिता मुरकुटे, छाया कांबळे, कैलास शिंदे, नाना डोळस, स्वाती आढाव, अलका कदम, आयुबभाई शेख, संतोष शिंदे यांच्यासह विविध स्तरातील नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *