जगातील एकमेव मंदिर असलेल्या गुरु शुक्राचार्य मंदिरास गयाना देशाचे भारताचे राजदूत डॉक्टर के जे श्रीनिवास यांची भेट मनोभावे केली पूजा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.१५ जानेवारी मकर संक्रांती च्या शुभ दिवशी गुरू शुक्राचार्य महाराजांचे दर्शन व आशिर्वाद घेण्यासाठी खास गयाना या देशाचे भारताचे राजदूत डॉ के जे श्रीनिवास हे आपल्या मंदिरात आले होते . मंदिरात गुरू शुक्राचार्य महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले नंतर त्यांनी आवर्जुन मंदिराचा इतिहास तसेच मंदिराचे महत्त्व , मंदिरात साजरे केले जाणारे उत्सव या बद्दल जाणून घेतले . तसेच आम्हा सर्वांची आस्थेने चौकशी केली व आपण करत असलेल्या महाराज्यांच्या व मंदिर कार्या बद्दल आमचे खूप खूप कौतुक केले आणि शुभेच्छा ही दिल्या . व जाताना त्यांनी आम्हा सर्वां बरोबर त्यांच्या मोबाईल मध्ये खास फोटोही काढले. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाने गुरू शुक्राचार्य मंदिराला भेट दिल्या बद्दल मंदिर प्रशासनाचे वतीने त्यांचा खास सत्कार करण्यात आला .

या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड , तसेच मंदीर प्रमुख श्री सचिन परदेशी, उप मंदिर प्रमुख श्री प्रसाद पऱ्हे , श्री नितीन भवर , श्री संजय वडांगळे , श्री बाळासाहेब गाडे , श्री बाळासाहेब लकारे , श्री भागचंद रुईकर व मंदिरातील गुरू , व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *