जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयाच्या खेळाडूंचा विजय…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील एस.एस.जी.एम. महाविद्यालय येथे दि.10/12/2022 रोजी 14,17 व 19 वर्षाखालील मुले व मुली यांच्या जिल्हास्तरीय शालेय आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथील विद्यार्थी तेजस मधुकर कोते यांने 19 वर्षाखालील मुलांच्या गटात व पलक योगेश गंगवाल या विद्यार्थ्यांनीने मुलींच्या गटात तलवारबाजी स्पर्धेतील ईपी या प्रकारात विजय मिळवला आहे .दोन्ही विजयी खेळाडूंची अहमदनगर येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोकराव रोहमारे, सचिव संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त संदिप रोहमारे, प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूंना महाविद्यालयाचे शा.शि.संचालक डॉ.सुनिल कुटे व क्रीडा शिक्षक श्री.मिलिदं कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *