१३ फेब्रुवारी २०२३ रोजी नाभिक समाजाचा राज्यस्तरिय वधु वर पालक मेळावा:- मनोजजी वाघ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नाभिक समाजातील बांधवांना आनंदाची बातमी समोर येत आहे, की पूर्वी ठरल्या प्रमाणे साईबाबांच्या पावनभूमीत श्री संत सेना महाराजांच्या आशीर्वादाने आपण राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा दि.13/2/23वार सोमवार रोजी आयोजित करण्याचे ठरविले आहे. व आज आपण दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर वधूवरांची नाव नोंदणी सुरू करीत आहोत याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी.लवकरच वधु वर नाव नोदणी अर्ज आपल्या भागातील पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पर्यंत पोहोच होतील सर्वांनी मेळाव्यासाठी सहकार्य करावे ही आयोजकांनी विनंती केली आहे.सदरचा मेळावा राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या वतिने आयोजित केला आहे.मेळाव्याचे ठिकाण साई पालखी निवारा नगर मनमाड रोड,निमगाव निघोज (शिर्डी) ता.राहता जि.अहमदनगर. येथे असुन समाजातील इच्छुक नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *