दिवंगत व्यक्तीच्या स्मृतीतून वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळण्याचे कार्य कौतुकास्पद:- दौलतराव जाधव…

Uncategorized

शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमात साईभजन संध्या, उबदार वस्त्र भेट कार्यक्रम संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:- राहुल टेके हि अतिशय सेवाभावी व्यक्ती होती. गरजवंताच्या चेहऱ्यावर आनंद दरवळत राहावा, यासाठी त्यांचे कार्य सुरु होते. मात्र, नियतीच्या घाल्याने ते आपल्यातून गेले. परंतु, ज्याप्रमाणे थोर मोठे व्यक्ती होऊन जातात आणि त्यांचं नाव अजरामर राहते. त्याप्रमाणे राहुल दादाच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून राहुल दादाचं नाव अजरामर राहणार आहे. तसेच याच ट्रस्टच्या माध्यमातून दादाच्या स्मरणार्थ राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रमासह वृद्धाश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळण्याचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्गार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी काढले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, नाद संगीत विद्यालय व द्वारकामाई वृद्धाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथीलवृद्धाश्रमातील वृद्धांसाठी नुकताच साई भजन संध्या व उबदार वस्त्र भेट कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द्वारकामाई वृद्धाश्रमाचे कार्यकारी विश्वस्त बी. श्रीनिवास होते. यावेळी आश्रमातील १४२ वृद्धांना उबदार वस्त्र भेट म्हणून वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शिर्डीचे माहिती अधिकारी कार्यालयाचे अधिकारी सुरेश पाटील, जीएसटीचे राज्य कर निरीक्षक ज्ञानेश्वर जगताप, शिर्डी प्रेसक्लबचे अध्यक्ष प्रमोद आहेर, सोमैया उद्योग समूहाचे संचालक सुहास गोडगे, रत्नप्रभा एजन्सीचे व्यवस्थापक महेश जाधव, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, उद्योजक वेनुनाथ गोंदकर, आशीर्वाद प्रिंटर्सचे संचालक मोहन उकिरडे, एसएसबी असोसिएटचे संचालक शैलेश सिंनगर, वारीचे सरपंच सतीश कानडे, सदस्य मधुकरराव टेके, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, नाद संगीत विद्यालयाचे शंकर गोंडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राहुलदादा टेके यांच्या प्रतिमा पूजन व दिपप्रज्वल करून करण्यात आली.
निरीक्षक जाधव, जगताप व वृद्ध आजीने गायले गाणे.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक जाधव, राज्यकर निरीक्षक ज्ञानेश्वर जगताप व आश्रमातील वृद्ध आजी कमलबाई देवरे यांनी आपल्या सुमधुर आवाजात हिंदी चित्रपटातील गायलेल्या गाण्यांनी उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
नाद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली भजन सेवा.
यावेळी नाद संगीत विद्यालयाचे संचालक शंकर महाराज गोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली समीक्षा नेवगे, प्राची निमसे, वैष्णवी निमसे, किर्ती निमसे, राजलक्ष्मी कासार, प्राजक्ता सोनवणे, देवयानी गाढवे, भक्ती चव्हाण, यथार्थ तिवारी, संकेत काळोखे, साहिल क्षीरसागर, कृष्णा गोंडे, यश भड, साईश शिंदे, अनिकेत नन्नवरे यांनी सादर केलेल्या साईभजनातून आश्रमातील सर्वच वृद्ध मंत्रमुग्ध झाले होते. ही भजन संध्या सर्व वृद्धांसाठी चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी कैलास महाराज तिवारी, ग्रामपंचायत सदस्य विजय गायकवाड, विजयसिह गायकवाड, गौतम डोशी, चंद्रकांत पाटील, मच्छिद्र मुरार, दौलत वाईकर, दिनेश निकम, तुषार जगताप, विलास गोंडे, भाऊसाहेब टेके, मधुकर टेके, मदन काबरा, नवनाथ कवडे, विनायक सिनगर, रावसाहेब जगताप, अनंत टेके, गणेश भाटी, रामनारायण बनभेरू, अशोक निळे, मधुकर सोनवणे यांचेसह वृद्ध उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तवीक रोहित टेके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कैलास शेळके यांनी केले तर गोरख टेके यांनी आभार मानले.

फोटोओळी:-
शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमातील वृद्धांना उबदार वस्त्र भेटसह साई भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *