
कोपरगाव प्रतिनिधी:- येथील श्री सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत फायर सेफ्टी चे प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले. या प्रशिक्षणाची सुरुवात मा.श्री सुनील देशमुख सेवानिवृत्त भारतीय वायुसेना अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. सुभाष रणधीर हे अध्यक्षस्थानी होते. या प्रशिक्षणात मा.श्री सुनील देशमुख यांनी आपल्या दैनंदिन जीवनात अग्नि सुरक्षेचे महत्त्व आग लागण्याअगोदर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, आग लागल्यानंतर कुठली पावले उचलावी, महाविद्यालयात फायर सेफ्टी का महत्त्वाची असते. आपत्कालीन मदत यंत्रणांचे संपर्क क्रमांक, नकाशा योग्य ठिकाणी लावावेत. विद्यार्थ्यांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना फायर सेफ्टी ची माहिती, सुरक्षित जागा, त्याचबरोबर आग लागण्याची कारणे, आग लागल्यानंतरच्या उपयोजना यांची सविस्तर माहिती देण्यात आली. महाविद्यालयातील मैदानावर एन.एस.एस विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रत्यक्ष आग विझवण्याचे फायर सेफ्टी सिलेंडर द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. छोट्या स्वरूपातील आग कशी विझवावी. याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले, तसेच प्रात्यक्षिकांचा विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांच्याकडून प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत फायर सेफ्टी चे प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. सुभाष रणधीर यांनी अग्नी सुरक्षाचे महत्व तसेच प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. प्रा. डॉ. ए. बी. भागवत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी एन.एस.एस. विभाग प्रमुख डॉ. बी. ए. तराळ, ग्रंथपाल सी.टी. खैरनार तसेच सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षणास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनील काकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. महेश दिघे यांनी मानले .
