
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन व जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या वतीने श्रीरामपूर बस स्थानक, अशोकनगर साखर कारखाना व संगमनेर हिवरगांव टोल नाका येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. रस्ते अपघाताविषयी प्रबोधन व जनजागृती ही करण्यात आली. अशी माहिती श्रीरामपूर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी श्रध्दांजली वाहून स्मरणदिन पाळला जातो. यानिमित्ताने रस्ते अपघात होऊ नये यासाठी काय दक्षता घ्याव्यात. अपघात झाल्यास तातडीने करावयाची काळजी, ऊस वाहतूक करतांना घ्यावयाची दक्षता याबाबत मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे, रोहीत पवार आणि गणेश राठोड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित नागरिकांना अपघातग्रस्तांना मदत करण्याविषयी व रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याबाबत शपथ देण्यात आली.
या प्रबोधन व जनजागृतीच्या कार्यक्रमांना एस.टी.महामंडळाचे कार्यशाळा अधीक्षक विद्याधर साठे, श्री.लटपटे, अशोक नगर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे, सोपान राऊत, शेतकी अधिकारी श्री.चौधरी, निपाणी सरपंच आशिष दौंड, कोपरगांव ट्रक असोसिएशनचे अध्यक्ष अय्युब कच्छी, संगमनेर ट्रक असोसिएशन अध्यक्ष शरीफभाई मेंबर, शादाब शेख, बबलु काझी, अहमद हाजी, राहू कच्छी उपस्थित होते. या उपक्रमात नागरिक,कर्मचारी, ऊस वाहतूकदार, वाहनचालक व कारखान्याचे कर्मचारी व टोल नाका कर्मचारी सहभागी झाले होते. असेही श्री.डगळे यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.
