”महामंडळाच्या कर्ज वितरणात बँकांनी सहकार्य करावे” – अँड.नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
शासनाच्या वतीने अनुसूचित जाती, जमाती,इतर मागास समाजाच्या नागरिकांना देण्यात येणारे कर्ज वितरण करण्यात बँकानी सहकार्य करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की शासनाने अनुसूचित जाती जमाती,इतर मागास समाजातील नागरिक यांच्या आर्थिक विकासा साठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, रोहिदास आर्थिक विकास महामंडळ, अधिवासी आर्थिक विकास महामंडळ तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी विकास महामंडळाची स्थापना केली असून शासन या महामंडळा मार्फत सर्व सामान्य नागरिकांना थेट अनुदान देऊन बँकांमार्फत छोट्या मोठ्या व्यवसायाला कर्ज पुरवठा करत असते या महामंडळा मार्फत स्थानिक बँके मार्फत कर्ज पुरवठा करते तसेच बेरोजगार युवकांना जिल्हा उद्योग केंद्र यांच्या पंतप्रधान मंत्री युवा उद्योजक यांना कर्ज पुरवठा केला जातो मात्र स्थानिक बँका हे कर्ज पुरवठा करताना नागरिकांना खूप त्रास देतात आमच्या कडे कोठा शिल्लक नाही या योजनेतून कर्ज घेतलेले अनेक कर्जदार थकीत आहेत. नुसते कर्ज घेऊन लोक व्यवसाय सुरू करत नाही,संपूर्ण कागदपत्रे सादर करून व महामंडळा कडून कर्ज पुरवठा मंजूर होऊन देखील बँकेतील अधिकारी कर्ज पुरवठा करण्यासाठी टाळाटाळ करतात तसेच आधीच बेरोजगार असलेले युवा व्यासायिक कागदपत्रांची जुळवा जुळव करून त्रस्त झाल्या नंतर बँकेतील अधिकारी यांच्या अरे रावी व अडेलतट्टू पणामुळे अनेक तरुणांना त्रास सहन करावा लागतो
एका बाजूला सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून तरुण व्यवसाय करू पाहतात तसेच शासन स्टार्ट अप इंडिया, स्किल इंडिया अशा नवनवीन योजना आखून तरुणांना व्यवसायाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरी कडे बँका सुशिक्षित तरुणांना व्यावसायिक कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ करते केंद्र शासनाचा सद्या खाजगीकरण करण्याकडे जोर आहे विविध सरकारी कंपन्या बंद करून खाजगी उद्योग धंद्याना प्रोत्साहन देत आहे मग ते खाजगी करण फक्त धन दांडग्या उद्योग पतींना प्रोत्साहन देण्यासाठीच आहे का? असा प्रश्न पडला असून दुसरी कडे नवीन व्यावसायिकांना बँका कर्ज देण्यास निरुत्साही आहेत या महामंडळांच्या कर्ज पुरवठ्यास बँकांनी आडकाठी आणू नये या बाबत लवकरच बँकांनी आपले धोरण जाहीर करून कार्यपद्धतीत सुधारणा करावी अन्यथा बेरोजगार तरुणांसाठी विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा या पत्रकाद्वारे दिला असून या पत्रकावर लोक स्वराज्य आंदोलनाचे सुजल चंदनशिव,किरण सोळशे,सोमनाथ म्हस्के,नाना बत्तीस, क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन चे दिपक आरणे,अनिल पगारे, रवी डोलारे,मयूर साळवे,अधिवासी संघटनेचे मंगेश औताडे,अमित आगलावे,मनसे चे सुनील फंड, संतोष गंगवाल, अनिल गायकवाड भूमी पुत्रचे निसार शेख, अकबर शेख,आर पी आय गवई गटाचे अशोक शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अजय विघे,अमित आढाव,संजय तूपसुंदर चर्मकार संघटनेचे संजय पोटे,सागर आहेर, विजय पवार,आप चे अमित खोकले,एम आय एम चे तौफिक मणियार आदींच्या सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *