
कोपरगाव प्रतिनिधी:-
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्ताने
महाराष्ट्र लघुवृत्त पत्र व पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पत्रकार रविंद्र जगताप यांना दि.१६ नोव्हेबर २०२२ रोजी श्रीरामपुर या ठिकाणी महाराष्ट्र लघुवृत्त पत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. राज्यभरातुन पत्रकार याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, साई चैतन्य प्रतिष्ठान ,मराठा विकास फाउंडेशन, एस.जी न्युजच्या वतिने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
