“हमाल पंचायतीने छ शिवाजी महाराज यांचा वारसा जपला”:- अँड.नितीन पोळ…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
छ शिवाजी महाराज यांनी अठरापगड जाती सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्याच प्रमाणे हमाल पंचायतीने छ शिवाजी महाराज यांचा वैचारिक वारसा जपला आहे असे गौरवोद्गार लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
कोपरगाव हमाल पंचायतीच्या वतीने छ शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला छ शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय चव्हाणके हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ म्हस्के यांनी केले
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोळ पुढे म्हणाले की छ शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्याच प्रमाणे हमाल पंचायत मध्ये देखील विविध जाती धर्माचे लोक एकत्र आले असून हमाल पंचायतीने खऱ्या अर्थाने छ शिवाजी महाराज यांचा वैचारिक वारसा जपला आहे असे गौरवोद्गार काढले आहे.
यावेळी भाऊसाहेब शेळके,वाल्मिक कदम,विजय चव्हाणके,थोरात साहेब ,दीपक ढोणे ,नळे साहेब, माधव वाघचौरे, गोरक्षनाथ साळुंके, बाळासाहेब गिते
बाबासाहेब साळुंके, अशोक भागवत, अशोक म्हस्के,नितीन ताकवले भाऊसाहेब पवार,सागर नाईक वाडे आदी मान्यवर व सर्व हमाल बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *